JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : अश्विनच्या सेंच्युरीनंतर सिराजचं जबरदस्त सेलिब्रेशन Viral, पाहा VIDEO

IND vs ENG : अश्विनच्या सेंच्युरीनंतर सिराजचं जबरदस्त सेलिब्रेशन Viral, पाहा VIDEO

इंग्लंड विरुद्ध सेंच्युरी झळकावल्यानंतर अश्विन (R. Ashwin) आनंदी झालाच, पण सिराजनंही (Mohammed Siraj) जबरदस्त सेलिब्रेशन केलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 15 फेब्रुवारी : भारतामध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळत असलेला मोहम्द सिराज (Mohammed Siraj) सध्या चांगलाच ट्रेंडिंग आहे. सिराजनं सेंच्युरी झळकावली नाही, किंवा त्यानं मॅच जिंकणारा रन (Winning run) देखील काढलेला नाही. हे असूनही सिराज सोशल मीडियावर (Social Media) सध्या ट्रेंडिंग आहे. याचं कारण म्हणजे आर. अश्विननं सेंच्युरी झळकावल्यानंतर त्यानं केलेलं सेलिब्रेशन हे आपला सहकारी, मित्र यशस्वी झाल्यावर एखाद्याला कशा पद्धतीनं आनंद होऊ शकतो, याचं हे उदाहरण आहे. चेन्नईच्या स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर अश्विननं 148 बॉलमध्ये 106 रन केले. त्याची ही पाचवी सेंच्युरी आहे. अश्विनच्या या सेंच्युरीमध्ये सिराजचंही मोठं योगदान होतं. सिराजनं अश्विनसोबत शेवटच्या विकेटसाठी 49 रनची पार्टरनरशिप केली. अकराव्या नंबरला आलेला सिराज एका बाजूनं उभा राहिल्यानंच अश्विननं सेंच्युरी पूर्ण केली.

(वाचा -  IND vs ENG : चेन्नईच्या मैदानात सुरक्षेशी ‘खेळ’ मॅच दरम्यान घडली गंभीर घटना! )

इंग्लंड विरुद्ध सेंच्युरी झळकावल्यानंतर अश्विन आनंदी झालाच, पण सिराजनंही जबरदस्त सेलिब्रेशन केलं.

सिराजचं हे सेलिब्रेशन पाहून प्रत्येक जण त्याची एक सच्चा टीम प्लेयर म्हणून प्रशंसा करत आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

या सेंच्युरीनंतर आर. अश्विन 106 रनवर आऊट झाला. तर सिराज 16 रनवर नाबाद राहिला. आता इंग्लंडसमोर विजयासाठी 482 रनचं खडतर आव्हान आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या