JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : टीम इंडियाला धक्का, मोठ्या खेळाडूची चौथ्या टेस्टमधून माघार

IND vs ENG : टीम इंडियाला धक्का, मोठ्या खेळाडूची चौथ्या टेस्टमधून माघार

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 27 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) चौथ्या टेस्टमधून माघार घेतली आहे. बुमराहनं वैयक्तिक कारणामुळे या टेस्टमधून माघार घेतली असल्याची माहिती बीसीसीआयनं (BCCI) दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट चार मार्चपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. बुमराहच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. कोण घेणार बुमराहची जागा? जसप्रीत बुमराहला चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी बुमराहच्या जागेवर मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) समावेश करण्यात आला होता. यंदा देखील सिराज अंतिम 11 साठी प्रमुख दावेदार आहे. सिराजची अनुभवी बॉलर उमेश यादवशी (Umesh Yadav) स्पर्धा आहे. यादवला ऑस्ट्रेलियामध्ये झालेली टेस्ट सीरिज दुखापतीमुळे अर्धवट सोडावी लागली होती. त्यानंतर त्याने तिसऱ्या टेस्टपूर्वी टीममध्ये पुनरागमन केलं आहे. NEWS - Jasprit Bumrah released from India’s squad Jasprit Bumrah made a request to BCCI to be released from India’s squad ahead of the fourth Test owing to personal reasons. More details - https://t.co/w2wlfodmq8 #INDvENG pic.twitter.com/mREocEuCGa — BCCI (@BCCI) February 27, 2021 चार टेस्टच्या या मालिकेत भारतीय टीम सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (WTC) फायनल गाठण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं आवश्यक आहे. तसं झालं तर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. भारतानं ही टेस्ट गमावल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यानं इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ( वाचा :  IPL 2021: मुंबईतील सामन्यांना कोरोनाचा धोका, BCCI नं निवडली पाच शहरं ) भारताची टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेट किपर), आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, वृद्धीमान साहा, कुलदीप यादव, केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि हार्दिक पांड्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या