हेडिंग्ले, 24 ऑगस्ट: टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) त्याच्यावर होत असलेल्या संथ खेळाच्या आरोपाला चोख उत्तर दिलं आहे. या प्रकारच्या गोष्टींचा मला त्रास होत नाही, उलट माझे मनोधैर्य वाढते. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत, याचा मला आनंद असल्याचं अजिंक्यनं स्पष्ट केलं आहे. त्यानं यावेळी लॉर्ड्स टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारानं (Chetshwar Pujara) केलेल्या बॅटींगचाही त्यानं बचाव केला. अजिंक्यनं लॉर्ड्स टेस्टमध्ये 146 बॉलमध्ये 61, तर पुजारानं 206 बॉलमध्ये 45 रनची खेळी केली होती. या दोघांनी केलेल्या भागिदारीमुळे टीम इंडियाची इनिंग सावरली. पण, त्यांच्यावर संथ खेळ केल्याची टीका केली. हेंडिग्लेमध्ये बुधवारपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टपूर्वी (India vs England 3rd Headlingley Test) पत्रकारांशी बोलताना अजिंक्यनं या आरोपांना उत्तर दिलं. लोकं नेहमीच महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल बोलतात, त्यामुळे मी या विषयाची फार काळजी करत नाही, असं अजिंक्य यावेळी म्हणाला. अजिंक्यनं यावेळी लॉर्ड्स टेस्टच्या खेळीबद्दल सांगितले की, ‘माझा नेहमीच टीमसाठी योगदान देण्यावर भर आहे. माझी कामगिरी समाधानकारक होती. मी नेहमीच टीमचा विचार करतो. पुजारा संथ खेळत होता, पण त्याचं पिचवर टिकून राहणे आवश्यक होते. मी आणि पुजारा बराच काळापासून क्रिकेट खेळत आहोत. या गोष्टींचा सामना कसा करायचा ते आम्हाला माहिती आहे. ज्या गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत, त्याबद्दल आम्ही विचार करत नाही.’ तालिबानचा क्रिकेटला फटका : अफगाणिस्तानची वन-डे सीरिज स्थगित त्याची काळजी नाही सध्याच्या टीम इंडियातील कोणत्याही खेळाडूला हेडिंग्लेमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. या गोष्टीची खेळाडूंना काळजी नाही, असं अजिंक्यनं सांगितलं. ‘तुम्ही फॉर्मात असता तेव्हा ती लय कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. मला हेंडिग्लेमध्ये खेळण्यात काही अडचण वाटत नाही. या सर्व गोष्टी मानसिक आहेत. आम्ही मानसिकरित्या मजबूत आहोत. सर्व खेळाडूंची मनस्थिती चांगली आहे.’ असं त्यानं यावेळी स्पष्ट केलं.