मुंबई, 18 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) आगामी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) टी 20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत टीम इंडियातील (Team India) खेळाडूची पहिली प्रतिक्रिया आली आहे. विराटचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे. विराटनं वन-डे आणि टेस्टसह टी20 टीमचीही कॅप्टनसी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्याच्या सहकाऱ्यानं दिली आहे. टीम इंडियानं नुकताच इंग्लंडचा दौरा केला. हा दौरा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यानं विराट कोहलीनं वर्ल्ड कपनंतरही टीम इंडियाची कॅप्टनसी करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं हे मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यानं कोहलीच्या कॅप्टनसीची जोरदार प्रशंसा केली. ‘हा खूपच आश्चर्यकारक निर्णय आहे. विराटनं टी20 वर्ल्ड कपनंतरही कॅप्टन राहावं अशी माझी इच्छा आहे. त्यानं गेल्या काही वर्षांपासून भारताचा कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी केली आहे. मला त्याच्याशी बोलण्याचा योग आला नाही. टी20 टीमची कॅप्टनसी केल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आम्ही वर्ल्ड कप जिंकेपर्यंत तोच आमचा कॅप्टन आहे.’ असं शार्दुलनं सांगितलं. टीम इंडियाच्या कोचपदी राहणार का? शास्त्रींनी दिलं उत्तर, सांगितली सर्वात मोठी इच्छा शार्दुलनं यावेळी विराटची प्रशंसा करताना म्हणाला की, ‘तो खूपच सपोर्टिव्ह आहे. तसंच खेळाडूंना त्यांची सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देतो. माझ्याशी त्याचे संबंध खूप चांगले आहेत. आम्ही अनेकदा एकमेकांची चेष्टा मस्करी देखील करतो. मला त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळायला आवडतं. तो नेहमी जास्तीत जास्त क्षमतेनं खेळ खेळण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतो.’ ‘विराट कोहलीला T20 नंतर आणखी एका टीमची कॅप्टनसी सोडावी लागणार’, माजी क्रिकेटपटूचा दावा विराट कोहलीनं गुरुवारी टी20 टीमची कॅप्टनसी सोडणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. ‘T20, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गेली 8-9 वर्षं सातत्याने खेळत आहे. त्यातली 5-6 वर्ष तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणूनही मी काम केलं. या वर्कलोडचा विचार करता मला स्वतःला थोडी स्पेस देण्याची गरज वाटते. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून ODI आणि टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने मला स्वतःसाठी थोडा अवधी देण्याची गरज वाटते. म्हणूनच T20 World Cup संपल्यानंतर भारतीय T20 संघाचा कर्णधार म्हणून मी पायउतार होऊ इच्छितो’, असं कोहलीने लिहिलं आहे. ‘T20 टीमचा फलंदाज म्हणून मी भविष्यात खेळत राहणार आहे,’ असंही त्याने स्पष्ट केलं आहे.