JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : खराब अंपायरिंगचा आणखी एक नमुना, LBW पाहून बेन स्टोक्सला शॉक

VIDEO : खराब अंपायरिंगचा आणखी एक नमुना, LBW पाहून बेन स्टोक्सला शॉक

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) या आयपीएलमधील मॅचच्या दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल न देण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. त्यापाठोपाठ अंपायरचा आणखी एक वादग्रस्त निर्णय समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) या आयपीएलमधील मॅचच्या दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल न देण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. अंपायरच्या या निर्णयावर दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) नाराजी व्यक्त केली. त्याला त्यासाठी शिक्षाही झाली. हे प्रकरण ताजे असतानाच खराब अंपायरिंगचं आणखी एक उदाहरण उघड झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सलाही (Ben Stokes) धक्का बसला आहे. कौंटी चॅम्पियनशिपमधील हा व्हिडीओ आहे. स्पिनरनं टाकलेला बॉल अडवण्यासाठी बॅटरनं पॅडचा वापर केला. त्यावेळी त्याचा पॅड ऑफ स्टम्पच्या बराच बाहेर असतो. तसंच बॉलही पॅडच्या जवळ नसतो. त्यानंतरही फिल्डर्सनं अपिल करताच अंपायरनं लगेच त्याला आऊट दिलं. त्यामुळे आऊट झालेल्या बॅटरलाही आश्चर्यचकित झाला.

संबंधित बातम्या

खराब अंपायरिंगचं उदाहरण असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण या पद्धतीनं आऊट देणाऱ्या अंपायरवर टीका करत आहे. हा व्हिडीओ पाहून बेन स्टोक्सलाही धक्का बसला आहे. त्यानं ट्विटरवर तशी प्रतिक्रियाही दिली आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या आठव्या पराभवानंतर रोहित शर्मासोबत बाबर आझमही चर्चेत! आयपीएल स्पर्धेतही अंपायर्सचे निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. राजस्थान रॉयल्स विरूद्ध केन विल्यमसनला कॅच आऊट देण्याचा प्रकार चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीलाही संशायस्पद पद्धतीनं आऊट देण्यात आले होते. त्यावर क्रिकेट फॅन्सनी चांगलीच नाराजी व्यक्त केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या