JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / The Hundred आणि अन्य लीगमध्ये खेळण्याची भारतीय खेळाडूंची इच्छा, इंग्लंडच्या कॅप्टनचा दावा

The Hundred आणि अन्य लीगमध्ये खेळण्याची भारतीय खेळाडूंची इच्छा, इंग्लंडच्या कॅप्टनचा दावा

भारतीय खेळाडू इंग्लंडमधील द हंड्रेड (The Hundred ) आणि अन्य विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत, असा दावा इंग्लंडचा वन-डे आणि टी 20 टीमचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 एप्रिल : इंग्लंडच्या वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने भारतीय खेळाडूंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय खेळाडू इंग्लंडमधील द हंड्रेड (The Hundred) आणि अन्य विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत, असा दावा मॉर्गननं केला आहे. टी 20 लीगचा परिणाम अनेक आंतरराष्ट्रीय मॅचवर होत आहे, याबाबत आता विचार करण्याची आवश्यकता आहे, असं मतही त्यानं व्यक्त केलं आहे. मॉर्गननं स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ’ द हंड्रेड आणि जगभरातील लीगमध्ये खेळण्याच इच्छूक असणारे भारतीय खेळाडू मला माहिती आहेत. त्यानं जगभर प्रवास करण्याची तसंच नवी परिस्थिती आणि सांस्कृतिक अनुभव घेण्याची इच्छा आहे. त्यांच्या समावेशानं अन्य लीगचं देखील आणखी महत्त्व वाढेल,’ असं मॉर्गननं स्पष्ट केलं.  अर्थात त्यानं यावेळी त्यानं कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूचं नाव घेतलं नाही. ‘द हंड्रेड’ म्हणजेच एका डावात 100 बॉल या स्पर्धेचं आयोजन इंग्लंड आणि वेस्ट क्रिकेट बोर्ड (ECB) करणार आहे. ही स्पर्धा मागच्या वर्षी सुरु होणार होती. पण, कोरोनामुळे एक वर्षांसाठी स्थगित करण्यात आली आहे. ‘त्या’ खेळाडूंवर कारवाई नाही! खासगी लीग खेळण्यासाठी अधिक महत्त्व देणाऱ्या खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) योग्य कारवाई करत नाही, असं मत मॉर्गननं व्यक्त केलं आहे. ‘हा खेळ ज्या वेगानं वाढत आहे, तो माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तितक्या वेगानं बदल होत नाहीत, यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. खेळाडू जगभरातील लीग खेळण्यामध्ये व्यस्त असल्यानं तुम्ही तुमची सर्वश्रेष्ठ टीम द्विपक्षीय मालिकांमध्ये उतरवू शकत नाही,’  असे मॉर्गनने स्पष्ट केले. ( वाचा :  संजना गणेशननं शेअर केला Honeymoon चा फोटो, बुमराह म्हणतो… ) भारतीय क्रिकेटपटूंसाठी नियम काय? भारतीय क्रिकेट बोर्डानं (BCCI) कोणत्याही खेळाडूला विदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. यापूर्वी देखील काही खेळाडूंनी याबाबतची परवानगी बीसीसीआकडे मागितली आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच भारतीय खेळाडू विदेशी लीग खेळू शकतात. दुसरिकडं क्रिकेट विश्वातील अन्य सर्व देश आपल्या खेळाडूंना विदेशी लीग खेळण्याची परवानगी (NOC) देतात. ईसीबी सध्या ‘द हंड्रेड’ या लीगमध्ये भारतीय खेळाडू सहभागी व्हावेत यासाठी बीसीसीआयशी चर्चा करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या