JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 37 वर्षांच्या बॉलरचं T20 मध्ये वादळ, 13 बॉलमध्ये घेतल्या 5 विकेट्स

37 वर्षांच्या बॉलरचं T20 मध्ये वादळ, 13 बॉलमध्ये घेतल्या 5 विकेट्स

ऑस्ट्रेलियाच्या 37 वर्षांच्या अनुभवी बॉलरनं 13 बॉलमध्ये 5 विकेट्स घेत टीमच्या पराभवाची साखळी तोडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 6 जानेवारी : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेला कोरोनाचा विळखा पडला आहे. या स्पर्धेतील अनेक खेळाडूांना कोरोनाची लागण झाल्याने ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. त्यानंतरही ही स्पर्धा सुरू आहे. गेले काही दिवस मैदानाच्या बाहेर गाजणाऱ्या या स्पर्धेत बुधवारी 37 वर्षांच्या बॉलरनं जोरदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी बॉलर पीटर सीडलनं (Peter Siddle) अ‍ॅडलेड स्ट्राईकर्सकडून खेळताना होबार्ट हुरिकेन्सविरुद्ध (Adelaide Strikers vs Hobart Hurricanes) 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या या भेदक बॉलिंगमुळे स्ट्राईकर्सनी ही मॅच 7 विकेट्सनं सहज जिंकली. त्याचबरोबर  या सिझनमधील सहा पराभवांची मालिका देखील तोडली. सीडलनं टी20 कारकिर्दीमध्ये दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने 5 पैकी 4 जणांना बोल्ड केले. पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेली होबार्टची टीम 19.5 ओव्हर्समध्ये 126 रनवरच संपुष्टात आली. त्यांचे 6 बॅटर्स दोन अंकी रन देखील करू शकले नाहीत. डर्सी शॉर्टनं सर्वात जास्त 32 रन काढले. कॅप्टन सीडलनं 3.5 ओव्हर्समध्ये 23 रन देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या 10 बॉलवर एकही रन निघाला नाही. याचाच अर्थ त्याने फक्त 13 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर राशिद खाननं देखील 2 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या

स्ट्राईकर्सनं 15.1 ओव्हर्समध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केले. ओपनर मॅथ्यू शॉर्टनं 44 बॉलमध्ये नाबाद 72 रन काढले. या खेळीत त्याने 4 फोर आणि 5 सिक्स लगावले. मेट रेन्शॉनं 19 रन काढले तर होबार्टकडून संदीप लामिछानेनं 24 रन देत 2 विकेट्स घेतल्या. विराटच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण, मॅच सुरू व्हायच्या काही वेळ आधीच आला पॉझिटिव्ह सीडलनं त्याच्या टी20 कारकिर्दीत आजवर 82 सामने खेळले असून त्यामध्ये 94 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची फर्स्ट क्लास कारकिर्द देखील जोरदार आहे. त्याने 195 सामन्यातील 359 इनिंगमध्ये 27 च्या सरासरीनं 669 विकेट्स घेतल्या आहेत. एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने 26 वेळा केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या