JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराटसोबत छोले-भटूरे खाण्याची आहे 'या' ऑस्ट्रेलियन सुंदरीची इच्छा

विराटसोबत छोले-भटूरे खाण्याची आहे 'या' ऑस्ट्रेलियन सुंदरीची इच्छा

टीम इंडिया कॅप्टन विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभर फॅन्स आहेत. विराटला भेटण्याची, विराटशी बोलण्याची त्यांची प्रचंड इच्छा असते. या फॅन्सच्या विराटकडून अनेक अपेक्षा असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जून: टीम इंडिया कॅप्टन विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभर फॅन्स आहेत. विराटला भेटण्याची, विराटशी बोलण्याची त्यांची प्रचंड इच्छा असते. या फॅन्सच्या विराटकडून अनेक अपेक्षा असतात.ऑस्ट्रेलियन क्रिकेट अँकर क्लॉय अमांडा बेली (Chloe Amanda Bailey) ही देखील विराटची मोठी फॅन आहे. विराट आणि अनुष्कानं त्यांच्या मुलाला ऑस्ट्रेलियात जन्म द्यावा अशी अपेक्षा तिने यापूर्वी व्यक्त केली होती. त्याचबरोबर तिची विराटकडं आणखी एक अपेक्षा आहे. क्लॉयनं ट्विटरवर एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहलं होतं की, “विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) माझी आवडती टीम आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) महान खेळाडू असून मी भारतामध्ये जाऊन छोले-भटूरे खाणार आहे.

छोले-भटूरे ही विराट कोहलीची आवडती  डिश आहे. विराटने यापूर्वी देखील त्याचा अनेकदा उल्लेख केला आहे. त्याच कारणामुळे क्लॉयला भारतामध्ये येऊन छोले- भटूरे खाण्याची इच्छा आहे. विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ही क्लॉची आवडती आयपीएल टीम असून तिने यापूर्वी अनेकदा आरसीबीची जर्सी घालून टीमला पाठिंबा दिला आहे.

WTC 2021 Final : ‘फॉलो ऑन’च्या नियमाबाबत ICC ची मोठी घोषणा क्लॉय ही चॅनल 9 ची स्पोर्ट्स अँकर आहे. ती फिट राहण्यासाठी नियमित योगा करते. त्याचबरोबर तिला कुत्रेही खूप आवडतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या