JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बदलणार! टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बदलणार! टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन बदलण्याची चर्चा वेळोवेळी होत असते. भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये (India vs Australia ) झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर या मागणीनं आणखी जोर पकडला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिडनी, 13 मे: ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन बदलण्याची चर्चा वेळोवेळी होत असते. भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये (India vs Australia) झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर या मागणीनं आणखी जोर पकडला. आता ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेन (Tim Paine) यानं देखील कॅप्टन बदलण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. टीम पेनच्या जागी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला कॅप्टन करण्याची मागणी सातत्याने होत आहे. स्मिथनं देखील कॅप्टन होण्याची तयारी दाखवली आहे. या मागणीला आता पेननंही पाठिंबा दिला आहे." माझ्या मते आता त्याला कॅप्टन केलं पाहिजे. पण हा निर्णय माझ्या हातामध्ये नाही. मी स्मिथच्या कॅप्टनसीमध्ये खेळलो आहे. तो या भूमिकेसाठी योग्य वाटतो." असं पेननं सांगितलं आहे. टीम पेन पुढं म्हणाला की, ‘स्मिथ कॅप्टन म्हणून नेहमी अपेक्षित असलेले निर्णय घेतो. त्याच्या कॅप्टनसीमध्ये सर्व काही छान सुरु होते. त्याचवेळी अचानक दक्षिण आफ्रिकेतील घटना घडली आणि त्याची कॅप्टनसी काढून घेण्यात आली. त्याला पुन्हा कॅप्टन बनवण्याचा निर्णय झाला तर माझा पाठिंबा असेल." दक्षिण आफ्रिकेत काय घडलं होतं? स्टीव्ह स्मिथ कॅप्टन होता त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 साली झालेल्या टेस्टमध्ये बॉलची छेडछाड (ball tampering) करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ‘जंटलमन्स गेम’ या क्रिकेटच्या लौकिकाला यामुळे डाग लागला. या अपराधाबद्दल स्मिथला एक वर्ष क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर त्याला दोन वर्ष कॅप्टन करण्यासही बंदी घालण्यात आली होती. IPL 2021: ‘हे त्यांच्यासोबत का घडत नाही?’ वॉर्नरला मिळालेल्या वागणुकीवर गावसकरांचा सवाल स्टीव्ह स्मिथवर बंदी घातल्यानंतर टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन करण्यात आलं. पेनच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियानं 23 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी 11 मध्ये विजय मिळवला असून 9 मध्ये पराभव झाला आहे. तर स्मिथच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियानं 34 पैकी 18 टेस्ट जिंकल्या आहेत. स्मिथनं कॅप्टन म्हणून खेळलेल्या 60 इनिंगमध्ये 70.36 च्या सरासरीनं 3659 रन केले आहेत. यामध्ये 15 शतकांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या