JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्टीव्ह स्मिथला धक्का, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली मोठी मागणी!

स्टीव्ह स्मिथला धक्का, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली मोठी मागणी!

ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथचा (Steve Smith) या स्पर्धेत खेळण्याचा प्रस्ताव ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ नं (Cricket Australia) फेटाळला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियात सुरू असणारी बिग बॅश लीग स्पर्धा (Big Bash League) आता अंतिम टप्प्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथचा (Steve Smith) या स्पर्धेत खेळण्याचा प्रस्ताव ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ नं (Cricket Australia) फेटाळला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यातील मालिका रद्द झाल्यानंतर स्मिथनं त्याची  बिग बॅशमधील टीम सिडनी सिक्सर्सशी (Sydney Sixers) संपर्क साधून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथला खेळण्याची परवानगी नाकारली. काय आहे कारण? सिडनी सिक्सर्सनी त्यांच्या टीममध्ये स्मिथसाठी जागा रिक्त ठेवली होती. शनिवारी पर्थ स्क्रॉचर्स विरुद्ध स्मिथला खेळवण्याचा प्रस्ताव सिक्सर्सनी ठेवला होता. पण, अन्य टीमच्या CEO ने त्याला आक्षेप घेतल्याचं सांगंत क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळला. त्याचबरोबर आणखी एक नियम स्मिथसाठी अडसर ठरल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या

बिग बॅश लीगमध्ये बदली खेळाडूसाठी फक्त लोकल पूलमधील खेळाडूंनाच घेतले जाऊ शकते. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर हा पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल तयार केला त्यावेळी ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड यांच्यातील मालिका रद्द झाली नव्हती. त्यामुळे स्मिथचा या पूलमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ लढत, मुंबईकरला मिळणार संधी! पाहा संभाव्य Playing 11 स्टीव्ह स्मिथ हे जागतिक क्रिकेटमधील मोठं नाव आहे. त्याने यापूर्वी सिडनी सिक्सर्स टीमची कॅप्टनसी देखील केली आहे. ‘नॉक आऊट’ राऊंडमध्ये स्मिथचा टीममध्ये समावेश झाला असता तर सिक्सर्सची टीम आणखी मजबूत झाली असती. सिक्सर्सनी शनिवारच्या मॅचमध्ये पर्थचा पराभव केल्यास त्यांची टीम थेट फायनलमध्ये दाखल होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या