ब्रिस्बेन, 10 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस सीरिज (Ashes Series 2021) मधील पहिली टेस्ट सध्या ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. या टेस्टचा शुक्रवारी तिसरा दिवस आहे. ट्रेव्हिड हेडनं (Travis Head) झळकावलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रनची भक्कम आघाडी घेतली आहे. इंग्लिश टीमचा आता डावाने पराभव टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या क्रिकेट टीममध्ये मैदानात जोरदार संघर्ष सुरू आहे. त्याचवेळी मैदानाच्या बाहेर घडलेल्या एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ब्रिस्बेनमध्ये ही मॅच पाहण्यासाठी आलेल्या तरूणाने भर मैदानात त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. शुक्रवारी पहिल्या सेशनमधील ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान हा प्रकार घडला. पांढरा टी शर्ट आणि टोपी घातलेला हा तरूण इंग्लंड टीमचा फॅन आहे. तर त्याची गर्लफ्रेंड ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमची फॅन असून ती आवडत्या टीमची जर्सी घालून मैदानात उपस्थित होती. या तरूणाने त्याच्या गर्लफ्रेंडला टीव्ही स्क्रीनकडे पाहण्यासाठी सांगितले. त्या तरूणीने पुन्हा मागे वळून पाहिले तेव्हा तो तरूण गुडघ्यात खाली वाकला होता. त्याने अंगठी बाहेर काढत गर्लफ्रेंडला प्रपोज केले. त्या तरूणीने देखील हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर या तरूणाने गर्लफ्रेंडला उचलत आनंद व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियन तरूणीला प्रपोज करणाऱ्या त्या इंग्लिश फॅनचं नाव रॉब हेल आहे. या दोघांची पहिली भेट 2017 साली इंग्लंड टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी झाली होती. त्यावेळी रॉब बार्मी आर्मीचा सदस्य होता. रॉबीनने अखेर चार वर्षांनी त्याची गर्लफ्रेंड नतालियाला प्रपोज केले. बार्मी आर्मीने खास ट्विट करत या जोडप्याचं अभिनंदन केले आहे. धोनीच्या शिष्याचा ‘डबल धमाका’, 24 तासांत ठोकले दुसरे शतक! रोहित देणार दक्षिण आफ्रिकेत संधी