सिडनी, 7 जानेवारी : बॉल वेगाने स्टंपवर आदळला तरीही बॅटर आऊट झाला नाही, हे क्रिकेटमध्ये कमीच पाहयला मिळते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील सिडनी टेस्टमध्ये असाच एक दुर्मिळ प्रकार घडला. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) हा या घटनेतील सुदैवी बॅटर होता. स्टोक्सने या घटनेचा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याने डोक्याला हात लावला. तर अन्य सर्व खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. काय घडला प्रकार? सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडची बॅटींग सुरू असताना हा प्रकार घडला. लंचनंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो ही जोडी मैदानात होती. इंग्लंडच्या इनिंगमधील 31 वी ओव्हर कॅमेरून ग्रीनने टाकली. त्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर हा अजब प्रकार घडला. ग्रीनचा आतमध्ये येणारा बॉल स्टोक्सने सोडून दिला होता. त्या बॉलवर त्याने कोणताही फटका मारला नाही. त्यावेळी बॉल ऑफ स्टंपला लागून मागे गेला. हा सर्व प्रकार अंपायर किंवा ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सना समजलाच नाही. ऑस्ट्रेलियन टीमनं स्टोक्स कॅच आऊट असल्याचे अपिल केले. मैदानातील अंपायर पॉल रायफल यांनीही ते अपिल मान्य करत बोट वर केले. स्टोक्सने त्या निर्णयाच्या विरोधात DRS घेतला. DRS मधून समोर आलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला.
ग्रीनने टाकलेला बॉल स्टोक्सच्या बॅटला लागला नव्हता. तर तो सरळ ऑफ स्टंपला लागला. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वेगात बॉल स्टंपला लागूनही स्टंप किंवा बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे अंपायरला त्यांचा निर्णय बदलून स्टोक्स नॉट आऊट असल्याचे जाहीर करावे लागले. हा सर्व व्हिडीओ पाहून जे घडलंय त्यावर स्टोक्सचाही विश्वास बसत नव्हता. त्याने यावेळी डोक्याला हात लावला. हे जीवदान मिळाले तेव्हा स्टोक्स 16 रनवर खेळत होता. त्यानंतर त्याने या निर्णयाचा फायदा उठवत या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. T20 क्रिकेट होणार आणखी फास्ट, संथ खेळाबद्दल ICC कडून मिळणार शिक्षा