सिडनी, 5 जानेवारी : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) चौथी टेस्ट सुरू झाली आहे. या सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात टाकली आहे. आता इंग्लंडला उर्वरित प्रतिष्ठा वाचवण्यासाठी दोन टेस्ट ड्रॉ करणे आवश्यक आहे. सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी दोन्ही टीमनी चांगला संघर्ष केला. त्याचवेळी फॅन्सनीही खेळाचा आनंद लुटला. बुधवारच्या खेळातील तिसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडचा स्पिनर जॅक लीच (Jack Leach) याला एका फॅननं स्वाक्षरी (Autograph) मागितली. लीच तेव्हा बाऊंड्रीवर फिल्डिंग करत होता. त्या फॅनच्या विनंतीला मान देत लीच प्रेक्षकांमध्ये पोहचला. त्यावेळी फॅनने स्वाक्षरीसाठी डोके पुढे केले. लीचने देखील त्याच्या डोक्यावर स्वाक्षरी केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरीस या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 51 रनची भागिदारी केली. वॉर्नर 30 रन काढून आऊट झाला. त्यानंतर लाबुशेन आणि हॅरीसनं दुसऱ्या विकेटसाठी 60 रन जोडले. हॅरीला 38 रनवर अँडरसननं आऊट केलं. तर लाबुशेनची विकेट (28) मार्क वूडने घेतली. पहिल्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियानं 3 आऊट 126 रन केले आहेत. व्हॉलीबॉल खेळता-खेळता बनला क्रिकेटपटू! ऐतिहासिक विजयाचा ठरला शिल्पकार ऑस्ट्रेलियानं या सीरिजमधील पहिली टेस्ट 9 विकेट्सनं, दुसरी 275 रनने आणि तिसरी एक इनिंग आणि 14 रनने जिंकली आहे.