JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'त्या सर्वांनी मिळून विराटच्या अर्ध्या मॅचही खेळल्या नाहीत', वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं फटकारलं

'त्या सर्वांनी मिळून विराटच्या अर्ध्या मॅचही खेळल्या नाहीत', वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं फटकारलं

विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवल्यानंतर आता एक आठवडा उलटला आहे. त्यानंतरही या विषयावरचा वाद संपलेला नाही. आता वर्ल्ड कप विजेत्या टीममधील खेळाडूने विराटची बाजू घेतली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवल्यानंतर आता एक आठवडा उलटला आहे. त्यानंतरही या विषयावरचा वाद संपलेला नाही. विराटनं बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा दावा फेटाळला. त्याचबरोबर निवड समितीनं आपल्याला फक्त दीड तास आधी कॅप्टनसीवरुन हटवत असल्याचे कळवले, असा खुलासा केला. विराटच्या पत्रकार परिषदेनंतर हे प्रकरण आणखी तापले आहे. 1983 मधील वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य आणि माजी भारतीय क्रिकेटपटू किर्ती आझाद (Kiriti Azad) यांनी या प्रकरणात विराट कोहलीची बाजू घेतली आहे. निवड समितीने या विषयावर सौरव गांगुलींची परवानगी मिळाल्यानंतरच निर्णय घेतला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ‘विराटला हटवण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला असेल तर त्यांनी बोर्डाच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असेल. सामन्यपणे कोणतीही टीम निवडल्यानंतर हीच पद्धत वापरली जाते. मी निवड समितीचा सदस्य होतो त्यावेळी देखील आम्ही टीम निवडल्यानंतर आधी अध्यक्षांकडे जात असू. त्यांती परवानगी मिळाल्यानंतरच टीमची घोषणा करण्यात येत असे. या प्रकरणात साहजिकच कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतला असेल तर निवड समितीने हे अध्यक्षांना लेखी कळवले असेल. विराट हा नाराज झालेला नाही, पण ज्या पद्धतीनं त्याला सांगण्यात आले त्यामुळे दुखावला गेला आहे. त्यामुळे हा विषय गांगुलीकडे गेला तेव्हा त्यानेही अनधिकृतपणे या विषयावर बोलायला हवे होते. मला यावर फार बोलायचं नाही. निवड समितीचे सर्व सदस्य हे चांगले आहेत. पण, तुम्ही त्यांच्या सर्वांच्या मॅचची बेरीज एकत्र केली तरी त्याची संख्या विराटने खेळलेल्या एकूण मॅचच्या निम्मी नाही.’ याकडे आझाद यांनी लक्ष वेधले. क्रिकेटवर कोरोनाचं संकट कायम, वेस्ट इंडिजनंतर ‘या’ टीमचे 4 खेळाडू पॉझिटिव्ह काय म्हणाला होता विराट? आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी निवड समितीने सांगितली, असं विराट मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हणाला होता. आपण विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं पण तो ऐकला नाही, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली होती. विराटने मात्र आपल्याला असं काहीही सांगण्यात आलं नसल्याचं सांगत गांगुलीचा दावा त्यानं खोडून काढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या