JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराट कोहलीनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होईल, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा दावा

विराट कोहलीनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होईल, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा दावा

विराट कोहली (Virat Kohli) हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. विराटनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण होईल? अशी चर्चा नेहमी होत असते. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी याबाबतचं उत्तर दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे : विराट कोहली (Virat Kohli) हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) टीममध्ये असतानाच विराट टीमचा कॅप्टन बनला. धोनीच्या मार्गदर्शनाचा त्याला कॅप्टनसीच्या सुरुवातीच्या काळात फायदा झाला. आज तो टेस्ट क्रिकेटमधील नंबर 1 टीमचा कॅप्टन आहे. विराटनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण होईल? अशी चर्चा नेहमी होत असते. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी याबाबतचं उत्तर दिलं आहे. विराट कोहलीनंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाचा कॅप्टन होईल, असा दावा मोरे यांनी केला आहे. “पंतमध्ये टीमला पुढे नेण्याची क्षमता आहे. तो भविष्यात कॅप्टन होऊ शकतो. तो हुशार  असून भविष्यात बरंच काही मिळवू शकतो. तुम्ही किती शिस्तबद्ध राहता आणि भविष्याकडे कसं पाहता, हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.” असे मोरे यांनी स्पष्ट केले. “पंतच्या खेळाचा आढावा घेतला तर त्यामध्ये अनेक चढ-उतार आहेत. त्याची सुरुवातीला वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली नव्हती. त्याला टी20 आणि वन-डे टीममधून वगळण्यात आले होते. पण त्याने ज्या पद्धतीनं टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं त्यामधून त्याची क्षमता दिसते. टीममधून वगळल्यानंतर पुनरागमन करणे अवघड असते, पण आपल्यात ती क्षमता असल्याचं पंतने दाखवून दिले आहे. तो भारतीय क्रिकेटला नक्की पुढे घेऊन जाईल.” असे मोरे यांनी सांगितले. ‘मी मूर्ख नाही…’ वासिम अक्रमने सांगितलं पाकिस्तानचा कोच न होण्याचं कारण ऋषभ पंतसाठी मागील सहा महिने खूप चांगले गेले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 274 रन काढले. यामध्ये ब्रिस्बेन टेस्टमधील 89 रनचा समावेश आहे. पंतच्या या खेळीमुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकता आली. त्यानंतर भारतामध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत 270 रन काढले होते. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेच्यापूर्वी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाल्याने त्याने दिल्ली कॅपिटल्सचं (DC)  प्रभावी नेतृत्त्व केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या