मुंबई, 23 डिसेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) सुरु आहे. या स्पर्धेत अॅडलेड स्ट्राईकर्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स (Adelaide Strikers vs Sydney Sixers) यांच्यामधील मॅच चांगलीच अटीतटीची झाली. स्ट्राईकर्सनं जोरदार प्रयत्न केल्यानंतरही सिक्सर्सनं या मॅचमध्ये विजय मिळवला. त्यांचा हा या सिझनमधील चौथा विजय आहे. या मॅचमध्ये निकालापेक्षा दोन खेळाडूंमधील रोमान्स हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला. ऑस्ट्रेलिया आणि अॅडलेड स्ट्राईकर्सचा अनुभवी फास्ट बॉलर पीटर सीडलनं (Peter Siddle) या मॅचच्या दरम्यान त्याचा सहकारी डॅनियल वॉरेलच्या (Daniel Worral) गालावर किस घेतलं. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मॅचमधील दुसऱ्या इनिंगमध्ये सिडनी सिक्सर्स टार्गेटचा पाठलाग करत असताना हा प्रकार घडला. स्ट्राईकर्सकडून पहिली ओव्हर वॉरेलनं टाकली. या ओव्हरमधील पहिला बॉल त्याने टाकल्यानंतर सिडेल आणि त्याच्यात बराच काळ चर्चा झाली. त्या चर्चेनंतर सीडलनं वॉरेलला किस केलं. बिग बॅश लीगच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या मॅचच्या कॉमेंटेटरनीही टी20 क्रिकेटमधील टेन्शनमध्ये हे प्रकार आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
पहिल्याच ओव्हरमध्ये एकमेकांवरील प्रेम दाखवून चर्चेत आलेल्या सिडेल आणि वॉरेल प्रत्यक्ष मॅचमध्ये मात्र फेल गेले. या दोघांनाही विकेट मिळाली नाही. स्ट्राईकर्सनं दिलेलं 148 रन्सचं आव्हान सिक्सर्सनी 4 बॉल आणि 4 विकेट्स राखत पूर्ण केले. या मॅचमध्ये सिक्सर्सच्या सिन एबॉटनं बिग बॅश लीग स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स (112) घेण्याचा विक्रम केला. रोहित शर्मा NFT च्या माध्यमातून देणार फॅन्सना खास गिफ्ट, वाचा एनएफटी म्हणजे काय?