भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
मुंबई, 15 जानेवारी : भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यांच्या भेटीचा फोटो पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला असून मोदींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याचा करता फार खास असणार आहे. याच कारण म्हणजे हा पुजारा याचा 100 वा कसोटी सामना असेल. तेव्हा या निमित्ताने त्याने मोदींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्याची पत्नी पूजा ही देखील उपस्थित होती.
पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यावर चेतेश्वर पुजारा याने ट्विट करत त्यांच्या सोबतच फोटो शेअर केला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुजाराने शेअर केलेल्या ट्विटवर उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘आज तुला आणि पुजाला भेटून आनंद झाला. तुझ्या कारकिर्दीतील 100 व्या कसोटीसाठी शुभेच्छा.’