JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup पूर्वीच पाकचे डावपेच सुरू; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा

T20 World Cup पूर्वीच पाकचे डावपेच सुरू; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा

काही दिवसात टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup )स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी, पाकचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाला पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे.

जाहिरात

T20 World Cup सुरु होण्यापूर्वी पाकचे डावपेच सुरु; टीम इंडियाला हरवा अन् ...

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: काही दिवसात टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup )स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी, पाकचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. भारत आणि पाकिस्तान (IndiaVS Pakistan)यांच्यातील क्रिकेट सामना जगातील सर्वात मोठ्या सामन्यांमध्ये गणला जातो. येत्या काही दिवसांत पहिल्या सामन्यात भारतापुढे पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाला पैशाचे आमिष दाखवण्यात आले असल्याची (pcb to get blank cheque if pakistan beat india in t20 world cup )माहिती समोर आली आहे. भारतीय आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना होतो तेव्हा, संपूर्ण क्रिकेट विश्वाचे डोळे या सामन्यावर खिळलेले असतात. आता सर्व क्रिकेड वेड्यांचे लक्ष टी-२० वर्ल्डकपकडे वेधलेले असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी संघाला माहिती दिली आहे की, ‘‘एका मोठ्या गुंतवणूकदाराने मला सांगितले आहे की, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघ भारतीय संघाला आगामी टी२० वर्ल्डकपमध्ये पराभूत करेल, तेव्हा ते पाकिस्तान क्रिकेट संघाला एक कोरा चेक देतील. या चेकवर खेळाडू त्यांची स्वत:ची बक्षीस रक्कम भरू शकतात.’’ या बातमीनुसार, हे धनादेश पाकिस्तानच्या एका मोठ्या उद्योजकाने पीसीबीला देऊ केले आहेत. आयपीसीच्या सिनेट स्थायी समितीच्या बैठकीत रमीज राजा यांनी ही माहिती दिली आहे. हे वाचा-  ‘पाकचे नापाक कृत्य; T20 World Cup सुरु होण्यापूर्वी समोर आला कारनामा वर्ल्डकप स्पर्धा मग ती, टी -२० किंवा वन डे असो, पाकिस्तान क्रिकेट संघाने आजपर्यंत भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान आणि भारत यांच्यात ७ सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताने सर्व सामने जिंकले आहेत. टी -२० विश्वचषकादरम्यान, भारतचा पाकिस्तानने एकूण ५ वेळा सामना केला, ज्यामध्ये भारताने ४ सामने जिंकले तर एक सामना अनिर्णीत राहिला. म्हणजेच विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक दोन्हीमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध कधीही विजय मिळवला नाही. हे वाचा-  T20 World Cup: 13 ऑक्टोबर रोजी होणार टीम इंडियात मोठा बदल, BCCI नं केली घोषणा आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार आहेत. २४ ऑक्टोबरपासून हे दोन्ही संघ आपल्या विश्वचषक स्पर्धेला सुरवात करणार आहेत. दुबईमध्ये होणाऱ्या पहिल्याच लढतीमध्ये दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्याची सर्व तिकीटे विकली गेली असून दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम हाउसफुल्ल होणार हे दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या