नवी दिल्ली, 27 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर वातावरण तापलं आहे. यात विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. दरम्यान, भाजपने दुसऱ्या बाजुने त्याचे समर्थन करणाऱ्या रॅलींचे आयोजन केलं. आता भाजपकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंचा कसा छळ होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा हा व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी शेअर केला आहे. यामध्ये शोएब अख्तरने सांगितले आहे की, कशा प्रकारे हिंदू असल्याने दानिश कनेरियाला पाकिस्तानचे खेळाडू एकटे पाडतात. तसेच त्याच्यासोबत कसे वागायचे हेदेखील अख्तरने सांगितले आहे. मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुले पाकिस्तानमध्ये छळ सोसणाऱ्या हिंदूंना भारतात आश्रय मिळत असेल तर मुस्लिम काँग्रेस आणि इतर लोक त्याला विरोध का करत आहेत?
भाजपचे आयटीसेल प्रमुख मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अख्तर म्हणतो की, मी माझ्या कारकिर्दीत दोन-तीन जणांशी वाद केला. जेव्हा लोक कराची, पेशावर किंवा पंजाबबद्दल बोलायचे तेव्हा मला राग यायचा. जर कोणी हिंदू असेल तर तो खेळेल. त्याच हिंदूने कसोटी मालिका जिंकून दिली. मी म्हटलं आता बोला… सर हा इथून जेवण का घेत आहे? तुला बाहेर उचलून फेकून देईन. देशाला 6-6 विकेट काढून तो देत आहे. मी फेमस झालो असलो तरी मालिका दानिशने जिंकून दिली आहे.
याबाबत दानिश कनेरियाने एएनआयशी बोलताना सांगितलं की, शोएब अख्तरनं जे आरोप केले त्यात तथ्य आहे. मी हिंदू असल्याने पाकचे खेळाडू माझ्याशी बोलायचेसुद्धा नाहीत. हिंदू आहे म्हणून बोलणं टाळणारे किंवा हिणवणारे यांचे नावही मी आता जाहीर करू शकतो असंही दानिशने म्हटलं. VIDEO हिंसाचार पसरविणाऱ्या तुकडे तुकडे गँगला काँग्रेसची फूस, शहांचा गंभीर आरोप