JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भर मैदानात महिला अँकरने कुरवाळली खेळाडूची दाढी, क्रिकेटपटूने केली कमेंट

भर मैदानात महिला अँकरने कुरवाळली खेळाडूची दाढी, क्रिकेटपटूने केली कमेंट

भरमैदानात महिला अँकर एका क्रिकेटपटूची दाढी कुरवाळत असल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 मार्च : क्रिकेटच्या मैदानावर अनेक अशा घटना घडतात ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता पाकिस्तान सुपर लीगमधील एक फोटो व्हायरल होत आहे. . पीएसएलच्या पाचव्या हंगमात एक महिला अँकर खेळाडूच्या दाढीसोबत खेळताना दिसत आहे. हा फोटो सोशल चर्चेत आला आहे. खरंतर महिला अँकरचा हा अंदाज अनेकांनी आवडला असल्याचंही म्हटलं आहे. या फोटोचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या पाचव्या हंगामात क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंगचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये महिला अँकर त्याच्या दाढीला हात लावताना दिसत आहे. ही महिला अँकर दुसरी तिसरी कोणी नसून बेन कटिंगची पत्नी आहे. अॅरिन हॉलंड ही बेन कटिंगची पत्नी असून ती अँकर आहे.

बेन कटिंगसोबतचा फोटो अँरिन हॉलंडने फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती बेनच्या दाढीला हात लावताना दिसत आहे. त्याच्यावर एरिन हॉलंडनं म्हटलं की, ही दाढी आता जाणार आहे. या फोटोवर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जीमी निशामनं मजेशीर कमेंट केली आहे. बेन जर तु दाढी कट केली नाहीस तर मी तुला किस करेन. हे वाचा : एका होकारासाठी 6 वर्ष ‘या’ सुंदर खेळाडूचा पाठलाग करायचा इशांत शर्मा अॅरिन हॉलंड अँकर असून तिने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये अँकरिंग केलं आहे. आयपीएल, बीग बॅश लीगमध्ये अँकरिंग केलेली अॅरिन ब्यूटी क्वीन, मॉडेल, डान्सरही आहे. 2013 मध्ये तिने मिस ऑस्ट्रेलियाचं विजेतेपद पटकावलं होतं. हे वाचा : IPL लिलावात लागली कोट्यवधींची बोली, आता एका फटक्यात ‘हे’ खेळाडू होणार कंगाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या