JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आता खेळाडू नाही करणार Bio Bubbleची तक्रार, बीसीसीआयने आखली नवी योजना

आता खेळाडू नाही करणार Bio Bubbleची तक्रार, बीसीसीआयने आखली नवी योजना

विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांना बायो-बबल (bio bubble) मध्ये राहून खेळाडूंना थकवा येतोय हे कारण देत टीम इंडियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.

जाहिरात

Team India

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, सर्वांचा हा समज गैसमज ठरला. स्पर्धेत खराब कामिगरीचे खापर विराटसेनेने बायो-बबलवर (bio bubble) फोडले. बायो-बबल मध्ये राहून खेळाडूंना थकवा येतोय हे कारण देत टीम इंडियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगामी काळात बीसीसीआय (BCCI) एक मोठे पाऊल उचलणार आहे. ज्यामुळे खेळाडूंना बायो बबलचा थकवा जाणवणार नाही. बीसीसीआय आता संघ निवडण्यापूर्वी खेळाडूची चाचणी घेईल आणि त्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करेल. या प्रक्रियेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील सहभागी असणार आहेत. राहुल द्रविड यांनी देखील खेळाडूंच्या थकव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत निवडकर्ते खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत निर्णय घेत असत. परंतु टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर खेळाडूंचा थकवा हे महत्वाचे कारण ठरले. अशा परिस्थितीत, सूत्रांच्या मते, बीसीसीआयला बायो-बबलचा खेळाडूंवर परिणाम होऊ नये असे वाटत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी20 सिरीज प्रारंभ होणार आहे. या सिरीजसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती देत म्हटले की, “बीसीसीआय निर्णय घेईल की, कुठल्या खेळाडूला विश्रांती द्यायची आहे. कुठला खेळाडू किती क्रिकेट खेळला आहे यावरून त्याचा निर्णय घेतला जाईल. ज्या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी आलेला खेळाडू चांगली कामगिरी करतो, तरीही त्या खेळाडूचे स्थान धोक्यात येणार नाही. त्याला त्याची जागा परत मिळेल.” तसेच विराट कोहली,रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना प्रत्येक नेहमी विश्रांती मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहे. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडला रवाना झाला होता. सप्टेंबर पर्यंत हा संघ इंग्लंडमध्ये होता. त्यानंतर आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा आणि टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत देखील खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या