JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'फिटनेस सिद्ध करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू इंजेक्शन घेतात' - चेतन शर्मांचा धक्कादायक खुलासा

'फिटनेस सिद्ध करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू इंजेक्शन घेतात' - चेतन शर्मांचा धक्कादायक खुलासा

भारतीय क्रिकेट विषयी धक्कादायक माहिती एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली असून यात भारतीय संघाशी संबंधित गोपनीय निवड प्रकरणांचा खुलासा करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी मंगळवारी एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान अनेक खुलासे केले.

जाहिरात

'फिटनेस सिद्ध करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू इंजेक्शन घेतात' - चेतन शर्मांचा धक्कादायक खुलासा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटचे अनेक चाहते असल्याने क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणात ग्लॅमर प्राप्त झाले आहे. अशातच भारतीय क्रिकेट विषयी धक्कादायक माहिती एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली असून यात भारतीय संघाशी संबंधित गोपनीय निवड प्रकरणांचा खुलासा करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी मंगळवारी एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान अनेक खुलासे केले. यात शर्मा यांनी दावा केला की  “देशातील अव्वल क्रिकेटपटू पूर्णपणे तंदुरुस्त नसताना देखील फिटनेस सिद्ध करण्यासाठी इंजेक्शन घेतात”. तसेच अनेक खेळाडू हे 80 ते 85 टक्केच फिट असताना इंजक्शन्स घेऊन व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.

खेळाडू फिट होण्यासाठी नक्की कोणते इंजेक्शन घेता यावर उत्तर देताना शर्मा म्हणाले, ‘हे पेन किलरचे इंजेक्शन नक्कीच नाही. कारण पेन किलरचे इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते. तसेच ते डोपिंगमध्ये देखील येऊ शकते. तेव्हा खेळाडू असे इंजेक्शन घेतात जे त्यांना काही काळात फिट करते, आणि जे अँटी-डोपिंग अंतर्गत देखील येणार नाहीत’. चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशन दरम्यान बीसीसीआयमधील अनेक गोपनीय गोष्टींचा देखील खुलासा केला. टी20 वर्ल्डकप दरम्यान जसप्रीत बुमराहच्या पदार्पणाबाबत संघ व्यवस्थापन आणि त्यांच्यामधील झालेल्या मतभेदाचीही माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच जसप्रीत बुमराह अजूनही पूर्णपणे फिट झाला नसून तो ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका तसेच वनडे मालिकेला देखील मुकणार आहे. चेतन शर्मा यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष यांच्यात इगो प्रॉब्लेम झाला असल्याचेही सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या