JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराटकडून कर्णधारपद काढून रोहितकडे का दिलं? गांगुलीनी सांगितलं कारण

विराटकडून कर्णधारपद काढून रोहितकडे का दिलं? गांगुलीनी सांगितलं कारण

विराट कोहलीकडून वन-डेची कॅप्टन्सी काढून ती रोहित शर्माकडे का दिली, याचं कारण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी सांगितलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तनवी दिल्ली, 9 डिसेंबर: रोहित शर्माची (Rohit Sharma) वन-डेच्या कर्णधारपदी (One day Skipper) निवड झाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI president Saurav Ganguly) यांनी याबाबत पहिल्यांदाच आपली जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआय आणि निवड समिती (Selection committee) यांनी एकत्रितपणे आणि एकमतानं रोहित शर्माची कॅप्टन म्हणून निवड केल्याची माहिती सौरव गांगुलींनी दिली आहे. बुधवारी रोहित शर्माची भारताच्या कॅप्टनपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली होती. विराटला केली होती विनंती वास्तविक, विराट कोहलीने टी-20 चे कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र विराट आपल्या निर्णयावर कायम होता. टी-20 आणि वन-डेसाठी वेगवेगळे कॅप्टन असणं योग्य नाही, असं निवड समितीचं मत झालं. त्यामुळे आम्ही रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. विराट कोहलीने स्वखुशीने ही जबाबदारी सोडली असून यापुढे रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळेल, असा विश्वास गांगुली यांनी व्यक्त केला आहे. विराटकडे कसोटीचं कर्णधारपद विराट कोहलीकडे कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद असेल, तर रोहित शर्मा हा वन-डे आणि टी-20 साठी भारताच्या कॅप्टन्सीची मदार सांभाळेल. तर कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. आम्हाला रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांवर पूर्ण विश्वास असून तो आपल्या कामगिरीनं हा विश्वास साध्य करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हे वाचा - टीम इंडियाच्या ऑल राऊंडरने झळकावलं शतक, आफ्रिका दौऱ्यासाठी दावेदारी सादर विराटचे मानले आभार विराट कोहलीनं आतापर्यंत वन-डे आणि टी-20 चा कॅप्टन म्हणून दिलेलं योगदान अतुलनीय आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचे सामने जिंकले आणि अनेक विक्रमही या काळात रचले गेले. त्यामुळे कोहलीनं एक कर्णधार म्हणून वनडे आणि टी-20 साठी दिलेलं योगदान महत्त्वाचं असून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ते नोंदवलं जाणार आहे. यापुढे रोहित शर्माकडे ही जबाबदारी असून ती पेलण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्याच्याकडे असल्याचा विश्वास बीसीसीआय आणि निवड समितीला आहे. भारताला आता टी-20 आणि वनडेसाठी वेगळा आणि कसोटीसाठी वेगळा कप्तान मिळाला आहे. त्यामुळे दोघांनाही कप्तान म्हणून फोकस करता येईल, असं मत गांगुली यांनी व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या