मुंबई, 18 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून इंडियन क्रिकेट (Indian Cricket) आणि बीसीसीआय सातत्यानं चर्चेत आहे. विराट कोहलीचं (Virat Kohli) कॅप्टन्सी सोडण्याचं प्रकरण, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि इंडियन टीमचा साऊथ आफ्रिकेत झालेला पराभव यामुळे इंडियन क्रिकेट सातत्यानं चर्चेत आहे. यादरम्यान आता आणखी एक नवीन बातमी समोर येत आहे. माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. गांगुली यांच्या व्यतिरिक्त, बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह (Jay Shah) यांचादेखील 3 वर्षांचा कार्यकाळ यावर्षी (2022) ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या जागी नवीन अध्यक्ष आणि सचिव नेमले जाणार की पुन्हा गांगुली-शहा यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यापूर्वी ते बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता. हे वाचा- Virat Kohli साठी मोहम्मद सिराजने लिहिली भावनिक पोस्ट; म्हणाला ‘To my superhero.. विराट कोहलीनं एकापाठोपाठ इंडियन क्रिकेट टीमच्या तिन्ही फॉरमॅटमधील कॅप्टन्सी सोडली. त्याच्या या अनपेक्षित निर्णयाला बीसीसीआय चीफ सौरव गांगुली आणि बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह यांना जबाबदार धरले जात आहे. दोघांनाही सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं आहे. परिणामी, आता लवकरच त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागेल अशी शक्यता आहे. नियमाप्रमाणं दोघांचाही कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट 2018 मध्ये संपणार होता. त्यापूर्वीच दोघांनीही कार्यकाळ वाढवण्यासाठी सुप्रीम कार्टात दाद मागितली होती. बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार, स्टेट क्रिकेट अथॉरिटी (State Cricket Authority) किंवा बीसीसीआयमध्ये सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर तीन वर्षांच्या कूलिंग-ऑफ पिरियडवर (Cooling-off period) जाणं बंधनकारक आहे. गांगुली आणि शाह यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये पदभार स्वीकारला. त्यापूर्वी गांगुली पश्चिम बंगालमध्ये तर जय शाह दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत होते. बीसीसीआयमध्ये नियुक्ती झाली तेव्हा स्टेट आणि नॅशनल युनिटमधील त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास फक्त नऊ महिने शिल्लक होते. त्यामुळे याबाबत हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ‘एजीएममध्ये 9 ऑगस्ट 2018 पासून लागू होणाऱ्या कुलिंग ऑफ पिरियडच्या नियमांत सुधारणा करून पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली आहे,’ या निर्णयाचा आधार घेऊन ही याचिका दाखल करण्यात आली होती. हे वाचा- “Match Fixing साठी मिळाली होती 40 लाखांची ऑफर” भारतीय क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ राहुल द्रविडसारख्या (Rahul Dravid) दिग्गज खेळाडूला टीम इंडियाचा हेड कोच (Head Coach) म्हणून नियुक्त करण्याची कामगिरी बीसीसीआयची चीफ म्हणून सौरव गांगुलीच्या नावे लावली जाईल. या शिवाय त्यानं व्हीव्हीएस लक्ष्मणला नॅशनल क्रिकेट अकॅडमी म्हणजेच एनसीएचं अध्यक्ष बनवलं. प्रदीर्घ काळ मैदानावर भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या या दोन्ही दिग्गजांचा संघातील युवा खेळाडूंना नक्कीच फायदा मिळेल. एकूणच सध्याच्या स्थितीची आढावा घेतल्यास बीसीसीआय भविष्यात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.