टीम इंडिया
मुंबई : वन डे वर्ल्ड कपची प्रतीक्षा तर चाहत्यांना आहेच, सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यंदा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी टीम इंडियात सिलेक्ट होण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे जीवतोडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. 20 खेळाडूंना या वेळी वन डे वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार नाही हे आधीच सांगितलं आहे. BCCI ने आशिया कपसाठी टीमची निवड केली आहे. ऋतुराज गायकवाडला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या संघात इंडियन प्रीमियर लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सहभागी होणारा संघ जवळपास निश्चित केला आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या सामन्यांमध्ये अनेक खेळाडू आजमावून एक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आता अंतिम केली जात आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या काही खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आली आहेत ज्यांना यात सहभागी होण्याची गरज नाही. बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात ज्यांची नावे आहेत ते विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाहीत. शुक्रवार, 14 जुलै रोजी बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष संघाची निवड केली. या संघाच्या घोषणेनंतर, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या लाइव्ह कॉमेंट्रीदरम्यान बीसीसीआयचे माजी अधिकारी सबा करीम यांनी सर्व खेळाडूंची नावे वाचून दाखवली. आशियाई स्पर्धेत जो कोणी खेळेल तो वर्ल्डकप संघाचा भाग असणार नाही, कारण दोन्ही स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जाणार आहेत, असे त्यांनी विशेष नमूद केले. 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. त्याच वेळी, एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ निवडला ऋतुराज गायकवाड (क), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)