JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / युवराजनंतर आणखी एका क्रिकेटपटूला कॅन्सर, धैर्याने मात करत झळकावलं शतक

युवराजनंतर आणखी एका क्रिकेटपटूला कॅन्सर, धैर्याने मात करत झळकावलं शतक

कॅन्सरशी तीन वर्षे झुंज दिल्यानंतर त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आणि जबरदस्त शतकी खेळी केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत क्रीडा क्षेत्रात अनेक दिग्गजांनी मोठी कामगिरी बजावली आहे. भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगसुद्धा कॅन्सरशी लढला आणि त्यानंतरही त्यानं मैदानावर पुनरागमन केलं. युवराजने भारताला 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर युवराजने आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. त्याच्यावर उपचार घेऊन युवराज पुन्हा मैदानात उतरला. आता आणखी एका खेळाडुने अशीच कॅन्सरवर मात केली आहे. वयाच्या 15 व्या वर्षी कॅन्सर झाल्यानतंर क्रिकेटच्या मैदानाऐवजी रुग्णालयात त्याच्या अधिक वेळ जात होता. कॅन्सरशी तीन वर्षे झुंज दिल्यानंतर त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आणि जबरदस्त शतकी खेळी केली. या खेळीसह त्यानं प्रतिस्पर्ध्यांवर मात तर केलीच पण कॅन्सरलासुद्धा पराभूत केलं. उत्तराखंडचा सलामीवीर कमल सिंग कनियालने गुरुवारी महाराष्ट्राविरुद्ध रणजीमध्ये पदार्पण केलं. यात त्याने 101 धावंची खेळी केली. यामध्ये त्याने 160 चेंडू खेळताना 17 चौकारही लगावले. वयाच्या 19 व्या वर्षी रणजीत पदार्पण करणाऱ्या कमल सिंग कनियाल याला 15 व्या वर्षी ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. वडिलासोबत ब्लड चेकअपसाठी गेल्यानंतर पुढचे उपचार नोएडात करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर रिपोर्ट आले तेव्हा सगळं सुन्न झालं होतं. ब्लड कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. आजारपणाबद्दल कमल सिंगला जास्त माहिती दिली नव्हती. त्यावेळी वारंवार तो आजारी पडायचा. नोएडातील रुग्णालयात डॉक्टरांकडूनच ब्लड कॅन्सरबद्दल त्याच्या कानावर पडलं. त्यानंतर उपचार सुरु असल्याने काळजी करत नव्हतो असं कमल सिंगने सांगितलं. त्यावेळी शरीराच्या 47 टक्के भागावर कॅन्सरचा प्रभाव झाला होता. त्यामुळे क्रिकेटपासूनही थोडा दूर झाला होता. उपचार घेतल्यानतंर तब्येतीत फरक पडला. वेगाने तंदुरुस्त होण्यासाठी आजुबाजुचं सकारात्मक वातावरण कारणीभूत ठरलं. सर्वजण मला प्रोत्साहन देत होते. माझं कुटुंब मला टायगर म्हणत होतं. मुलगा धाडसी आहे असंही म्हणायचे. यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळायचं असं कमल सिंगने सांगितलं. कॅन्सरवर सहा महिने उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी कमल सिंगला तू ठीक असल्याचं सांगितंल. त्यानतंर घरी काळजी घ्यावी लागेल असंही डॉक्टरांनी त्याला सांगितलं. या आजारपणातून बाहेर येण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. नंतर पहिलं काम कमलने केलं ते मैदानावर उतरण्याचं. खेळताना क्रिकेटचा चेंडू लागल्याने 12 वर्षाच्या मुलावर केला गोळीबार, दोघांना अटक उत्तराखंडचा संघ अंडर 19 सामना खेळत असताना कमल सिंगने पुनरागमन केलं. यात त्याने दोन द्विशतक, दोन शतकं आणि तीन अर्धशतकांसह 800 पेक्षा जास्त धावा केल्या. या जोरावर त्याला रणजी संघात स्थान मिळालं. त्यानंतर बारामतीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध पदार्पण करताना शतक साजरं केलं. ‘दादा, BCCI अध्यक्ष आहात आता तरी…’, गांगुलीला युवराजने दिला सल्ला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या