केएल राहुलच्या व्हायरल व्हिडीओवर संतापली अथिया
मुंबई, 28 मे : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल कधी फॉर्ममुळे तर कधी दुखापतीमुळे चर्चेत राहतो. आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून यावेळी कारण वेगळं आहे. केएल राहुलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून वाईट कमेंट त्याच्यावर केल्या जात आहेत. या व्हिडीओवर आता केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. केएल राहुलवरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. यावेळी त्याच्या व्हिडीओवरून वाद रंगला आहे. व्हिडीओ बरोबर की चुकीचा हे न पाहता तो सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे. यात दावा केला जातोय की केएल राहुल लंडनमध्ये क्लबमध्ये आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी भडकली आहे. हार्दिक पांड्या IPLचा इतिहास बदलणार? 14 संघ, 63 कॅप्टन्सना जमला नाही असा पराक्रम केएल राहुलची पत्नी अथियाने सोशल मीडियावर त्याच्या नावाने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. तिने स्पष्टपणे असं घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना सुनावलं. अथिया म्हणाली की, खरंतर मी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा गप्प राहणं पसंत करते. पण कधी कधी तुम्हाला तुमच्यासाठी उभा राहणंही गरजेचं असतं. मी, राहुल आणि एक मित्र एका सामान्य ठिकाणी गेलो होतो जिथे सर्व लोक जातात. त्यावर काहीही बोलणं आणि काहीही गोष्टी रचणं बंद करा. तुम्ही काही बोलण्याआधी त्याची चांगल्या पद्धतीने पडताळणी नक्की करून घ्या असा सल्लाही अथियाने दिला.