JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup महिन्याभरात, तारीख-ठिकाणाची घोषणा, या दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला!

Asia Cup महिन्याभरात, तारीख-ठिकाणाची घोषणा, या दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला!

आशिया कप 2022 च्या तारखा (Asia Cup 2022) आणि ठिकाणाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दृष्टीने आशिया कपही टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : आशिया कप 2022 च्या तारखा (Asia Cup 2022) आणि ठिकाणाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दृष्टीने आशिया कपही टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान युएईमध्ये आशिया कप खेळवला जाईल. याआधी आशिया कपचं आयोजन श्रीलंकेमध्ये होणार होतं, पण श्रीलंकेतली सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बघता आशिया कप युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला आहे. आशिया कपला क्वालिफायर राऊंडने सुरूवात होणार आहे. यामध्ये युएई, कुवैत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. क्वालिफायर राऊंडमधला विजेता मुख्य स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध खेळेल. या दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना रविवारी खेळवला जाईल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आशिया कप सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला आणि मग 4 सप्टेंबरला रविवार आहे, त्यामुळे या दोनपैकी एका दिवशी भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगू शकतो. आशियाई क्रिकेट काऊन्सिलसह ब्रॉडकास्टर्स या मॅचमधून जास्त टीआरपी मिळण्याची अपेक्षा करत आहे, त्यामुळे रविवारीच ही मॅच होईल, याची शक्यता सर्वाधिक आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ताणल्या गेलेल्या संबंधामुळे दोन्ही देशात फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच सामने होतात. याआधी मागच्या वर्षी युएईमध्येच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. वर्ल्ड कप इतिहासातला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच पराभव होता. आशिया कप ही स्पर्धा याआधी 2018 साली युएईमध्येच झाली होती, त्यावेळी भारताने फायनल जिंकत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आशिया कपमध्ये भारतीय टीम ही सगळ्यात यशस्वी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या