josh hazlewood
मुंबई, 12 डिसेंबर : ऑस्ट्रिलाया विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (Australia vs England) इंग्लंडचा 9 विकेट्सनं दणदणीत पराभव झाला. मात्र, दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडला पुनरागमन करण्याची संधी मिळणार आहे. कारण ऑस्टेलियाचा स्टार खेळाडू जोश हेजलवुड(josh hazlewood) जायबंदी झाल्याने तो संघातून बाहेर पडला आहे. इंग्लंडची दुसरी इनिंग 297 रनवर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रनची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना विजयासाठी फक्त 20 रनचे टार्गेट होते. ऑस्ट्रेलियाने ते आव्हान विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत इंग्लंडचा मोठा पराभव केला. अॅलेक्स कॅरी 9 रन काढून आऊट झाला. रॉबिनसनने त्याला आऊट केले. या सीरिजमधील दुसरी टेस्ट 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी, क्रिकेट जगतातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच हेजलवूडला स्नायूंचा ताण पडला होता. रिपोर्ट्सनुसार, हेजलवुड कॅज्युअल ड्रेसमध्ये ब्रिस्बेनहून सिडनीला रवाना झाला. त्याच्यासोबत कोणीही सहकारी दिसला नाही. म्हणजेच अॅडलेडमध्ये होणाऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये तो संघाचा भाग असणार नाही.
मिळालेल्या माहीतीनुसार, जोश हेझलवूड दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी झ्ये रिचर्डसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. रिचर्डसन खेळला तर हा त्याचा तिसरा कसोटी सामना असेल. त्याने 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ 8 षटके टाकून तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हेझलवूडच्या तंदुरुस्तीबद्दल अटकळ होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर जोश हेझलवूडची दुखापत स्वीकारताना दिसला.
जोश हेझलवूडच्या जागी दुसऱ्या कसोटीसाठी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या झ्ये रिचर्डसनने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत खेळलेल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये एका डावात 26 धावांत 3 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याने हे दोन्ही कसोटी सामने ब्रिस्बेन आणि कॅनबेरा येथे श्रीलंकेविरुद्ध खेळले आहेत. रिचर्डसनची समस्या अशी आहे की त्याने 2019 पासून आंतरराष्ट्रीय विकेटवर एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात जोश हेझलवूडने शानदार गोलंदाजी करताना पहिल्या डावात दोन बळी घेतले. त्याने हे दोन्ही गडी 42 धावांत बाद केले. यानंतर दुसऱ्या डावात त्याने एक विकेट घेतली. अशा प्रकारे त्याने पहिल्या कसोटीत एकूण तीन विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, जर आपण त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोललो तर, हेझलवुडने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 56 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात तो 215 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ६७ धावांत ६ बाद आहे.