rohit sharma reaction on rahane
नवी दिल्ली, 11 जुलै : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून सुरुवात होणार आहे. कसोटी सुरु होण्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत कर्णधार रोहित शर्मा हा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला काही प्रश्न विचारताना दिसतो. रहाणेने कर्णधार रोहित शर्माला त्याच्या स्टाइलने उत्तरे दिली. रहाणेला एक प्रश्न विचारण्यात आला की, तु भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहेस. नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हंगामाची सुरुवात होत आहे तर याकडे कोणत्या नजरेने पाहत आहेस?
रहाणेने या प्रश्नावर स्मित हास्य करत उत्तर देताना म्हटलं की, या वयात म्हणजे? मी अजून तरुण आहे यार, पण सध्या रोहित शर्मा जी भूमिका मला देईल ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन. यानंतर रोहित शर्माने प्रश्न विचारला की, वेस्ट इंडिजला खूपदा आला आहेस. या खेळपट्टीवर खेळला आहेस. धावाही केल्या आहेस. संघात नव्याने आलेल्या खेळाडूंना काय सांगशील? पाकिस्तानला वर्ल्ड कप खेळावाच लागेल; कारण, 283 कोटी अन् चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद रोहितच्या प्रश्नावर अजिंक्य रहाणे म्हणाला की, मी तरुण खेळाडूंना इतकंच सांगेन की फलंदाज म्हणून खूप संयम राखणं गरजेचं आहे. यावर रोहित शर्माने प्रश्न विचारला की, इथं खूप चिल्ड वातावरण असतं. अशा वातावरणात क्रिकेटपटूंसाठी किती गरजेचं आहे कामावर लक्ष देणं? पाच वाजल्यानंतर काय करायचं हे नंतर पाहू. रहाणे यावर म्हणाला की, ग्राउंडवर फोकस करणं गरजेचं आहे. दरम्यान, रोहित आणि रहाणे बोलत असतानाच अचानक पाऊस सुरू झाला आणि सर्वजण पळत मैदानातून बाहेर गेले.