मुंबई, 10 जानेवारी : टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळं सध्या अजिंक्य रहाणे आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. याआधी रहाणे आपली मुलगी आर्या हिला आपल्या गावी घेऊन गेला होता. आता रहाणे शुक्रवारी अजिंक्य भारत अ संघाकडून खेळण्यासाठी न्यूझीलंडला रवाना होईल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
वाचा- 5 वर्षे, 73 सामन्यानंतर द्रविडच्या शिष्याला विराटनं दिली टीम इंडियात जागा दरम्यान न्यूझीलंडला जाण्याआधी अजिंक्यने आपल्या ट्विटर अकाऊंटवर वडापाव खातानाचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर अजिंक्यने तुम्हाला कसा वडापाव खायला आवडतो?? अस प्रश्न विचारला. अजिंक्यच्या या प्रश्नांवर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मुंबईकर स्टाईल उत्तर दिले. वाचा- ‘मॅच जिंकला नाही तर…’, दिग्गज क्रिकेटपटूला पत्नीनं दिली धमकी; VIDEO VIRAL
वाचा- अखेर संजू सॅमसनला मिळाली संधी, श्रीलंकेने टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय अजिंक्यनं तुम्हाला वडापाव चहासोबत, वडापाव चटनीसोबत की फक्त वडापाव खायला आवडतो? यावर सचिननं, “मला लाल चटणीसोबत वडापाव खायला आवडतो. सोबत थोडी चिंच्याची चटणी खायला आवडते”, असे उत्तर दिले.