JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shehnaaz Gill चा 'तो' व्हिडीओ पाहून इमोशनल झाला अफगान क्रिकेटर राशिद खान

Shehnaaz Gill चा 'तो' व्हिडीओ पाहून इमोशनल झाला अफगान क्रिकेटर राशिद खान

सिद्धार्थच्या निधनामुळे शहनाज (shehnaaz gill ) कोलमडून गेली आहे. तिची ही अवस्था पाहून अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान (Rashid Khan) भावूक झाला आहे.

जाहिरात

Afghan cricketer rashid khan

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला(sidharth shukla) याचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. सिद्धार्थच्या निधनामुळे शहनाज (shehnaaz gill )इतकी कोलमडून गेली आहे की ती अजुनही स्वतःला सावरु शकलेली नाही. तिने नुकतेच एक गाणे शेअर केले असून तिच्या या गाण्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्याचा कडा पाणवल्या आहेत. अशातच, अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानदेखील तिची अवस्था बघून भावूक झाला आहे. त्याने तिच्यासाठी प्रार्थना केली (Afghan cricketer rashid khan react on shehnaaz gill song tu yaheen hai)आहे.

शहनाजचे गाणे ऐकून राशिद खान भावूक झाला

शहनाजने आपल्या इंस्टाग्रामवर ‘तू यहीं हैं’ गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. हे गाणे शेअर करताना सिद्धार्थसोबस बिग बॉसच्या घरात घालवलेले क्षण शेअर केले आहेत. शहनाज त्याच्याशिवाय एक क्षणही जगू शकली नाही आणि आज ती त्याच्याशिवाय जगायला शिकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

अशात तिचा हा व्हिडीओ अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानने पाहिला तेव्हा तोही भावूक झाल्याचे दिसून आले. तो प्रतिक्रिया देण्यास तो स्वतःला थाबवू शकला नाही. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शहनाजसाठी प्रार्थना केली. “अल्लाह तुम्हाला शक्ती देवो..” यासोबत त्याने अनेक हार्ट इमोजीही शेअर केले. rashid_khan_1.jpg शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यातील केमिस्ट्री आणि प्रेमाने भरलेले नाते व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. शहनाजने केवळ बिग बॉसमध्येच नव्हे तर अनेक शो आणि मीडियासमोर सिद्धार्थ शुक्लावरील प्रेम व्यक्त करण्यास कधीही संकोच केला नाही तर आता तिचे तेच प्रेम या व्हिडिओमध्येही दिसत आहे. सिद्धार्थ शुक्ला याचे २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो अवघा ४० वर्षांचा होता. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्तामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सगळ्यात जास्त धक्का सिद्धार्थची सर्वात जवळची मैत्रीण शहनाज गिल हिला बसला होता. रडून रडून शहनाजची अवस्था खूपच वाईट झाली होती. त्यामुळे तिने काही दिवस काम न करण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धार्थच्या जाण्यामुळे शहनाज एकटी पडली. शहनाज आणि सिद्धार्थची जोडी या दोघांच्या चाहत्यांना खूप आवडायची. ते या जोडीवर भरभरून प्रेम करायचे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या