JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवचा रोमँटिक अंदाज, मध्ये काच असूनही बायकोला केलं KISS

IPL 2021: सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवचा रोमँटिक अंदाज, मध्ये काच असूनही बायकोला केलं KISS

IPL 2021: आयपीएलमधील काही क्षण Moments Of the Season बनून जातात. असाच काहीसा प्रकार मुंबईचा तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवच्या बाबतीत घडला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल: आयपीएलमधील काही क्षण Moments Of the Season बनून जातात. असाच काहीसा प्रकार गुरुवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 14 व्या सीझनमधील 24 व्या सामन्यादरम्यान घडला. जहीर खानची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटके (Sagarika Ghatge) हिने हा क्षण तिच्या कॅमेऱ्यात टिपला असून तिने तो सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. झालं असं की मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या सामन्यादरम्यान त्याच्या पत्नीला किस केलं आणि त्याचा हा रोमँटिक अंदाज सागरिकाने तिच्या कॅमेऱ्यात टिपला आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात मुंबईने 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने रोमहर्षक विजय मिळवला पण सध्या इंटरनेटवर सूर्यकुमारच्या या फोटोची विशेष चर्चा झाली. सूर्यकुमारने गुरुवारी झालेल्या सामन्यात विशेष कामगिरी केली नव्हती.

सागरिकाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान या दोघांमध्ये एक काच असल्याचंही या फोटोत दिसत आहे. तरी देखील ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’ अशा अंदाजात सूर्यकुमार त्याची बायको देवीका शेट्टीला किस करताना दिसत आहे, त्यांच्या मध्ये काचेचा अडथळा असला तरीही. मुंबईचा मोठा विजय पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्सची (MI) टीम पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे.  मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 विकेट्सनं  पराभव केला. मागील दोन पराभवानंतर धडा घेत मुंबईच्या बॅट्समननं जबाबदारी खेळ करत हा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचा विकेट किपर - बॅट्सन क्विंटन डी  कॉक (Quinton de Kock)  या विजयाचा  हिरो ठरला. त्यानं मुंबईकडून सर्वात जास्त नाबाद 70 रन काढले. डी कॉकनं या आयपीएलमधील पहिली हाफ सेंच्युरी 35 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केली. रोहित शर्मा (14) आणि सूर्यकुमार यादव (16) यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या