JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

हिंदू धर्मात तुळशीचं रोप योग्य नियमांनुसार आणि योग्य ठिकाणी लावण्याचा सल्ला देण्यात आला असून, हे रोप घरामध्ये लावल्यास काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचंही सांगितलं आहे.

जाहिरात

तुळशीचे धार्मिक नियम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मार्च : अंगणात तुळशी वृंदावन (Tulsi) असणं म्हणजे भारतीय संस्कृतीचं लक्षण मानलं जातं. तुम्हाला भारतात बहुतांश घरांपुढे तुळशीचं वृंदावन दिसेल. रोज तुळशीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात तुळस खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पूजेत या पवित्र वनस्पतीची पानं वापरली जातात. हिंदू धर्मात तुळशीचं विशेष स्थान आहे. ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथं लक्ष्मीदेवीचा वास असतो आणि तिची कृपा सदैव राहते, असं मानलं जातं. इतकंच नाही तर तुळशीला विष्णुप्रिया असंही म्हणतात. ज्या घरात ही वनस्पती असते त्या घरात भगवान विष्णूंचा वास असतो. तुळशीचं पान भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्याच्या पदार्थांवर ठेवलं नाही तर ते नैवेद्य स्वीकारत नाहीत, अशीही एक मान्यता आहे. सनातन धर्मात तुळशीचं रोप योग्य नियमांनुसार आणि योग्य ठिकाणी लावण्याचा सल्ला देण्यात आला असून, हे रोप घरामध्ये लावल्यास काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचंही सांगितलं आहे. अयोध्येतील प्रसिद्ध पंडित राधेशरण शास्त्रीजी म्हणतात की, तुळशीचं रोप हे घरातील समृद्धीचं प्रतीक आहे, परंतु, जर तुम्ही तुळशीसाठी बनवलेले नियम पाळू शकत नसाल तर चुकूनही तुम्ही हे रोप लावायला नको. कोणत्या घरांमध्ये तुळशीचं रोप ठेवणं वर्ज्य मानलं जातं, हे जाणून घेऊया. या संदर्भात herzindagi.com ने वृत्त दिलंय. मांस आणि मद्य सेवन करणाऱ्या घरांमध्ये ज्या घरांमध्ये मांस (Non Veg) आणि मद्यसेवन केलं जातं तिथे तुळशीचं रोप लावू नये, अशी मान्यता आहे. अशा घरांमध्ये तुळशीचं रोप लावणं म्हणजे लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना नाराज करणं आहे, असं म्हणतात. जर तुमच्या घरात तुळशीचं रोप असेल तर तुम्ही चुकूनही मांसाहार, मद्यपान करू नये आणि या पदार्थांचे सेवन केल्यानंतर तुळशीला स्पर्शही करू नये. मांस किंवा मद्यप्राशन करून तुळशीला स्पर्श केल्यास घराची आर्थिक स्थिती बिघडण्यासोबतच आरोग्यावरही परिणाम होतो.

ज्या घरांमध्ये महिलांचा अपमान होतो जर एखाद्या घरात महिलेचा अपमान होत असेल आणि भांडणं होत असतील तर त्या घरात तुळशीचं रोप लावू नका. कारण स्त्रीचा अपमान करणं म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान करणं मानलं जातं आणि अशा घरात तुळशीची पूजा केल्यास पूजेचं योग्य फळ कधीच मिळत नाही. हे वाचा -  या 5 गोष्टी घरात नकारात्मक शक्ती वाढवतात! वास्तूदोष निर्माण होण्यास ठरतात कारण चुकीच्या दिशेने लावलेलं तुळशीचं रोप तुळशीच्या रोपासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते. चुकीच्या दिशेला लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरात अशांतता निर्माण होते, असं म्हणतात. तुमच्या घरात तुळशीच्या रोपाची योग्य दिशा नसेल तर तुम्ही तुळशी लावू नका. हे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये, ते दुःखाचं कारण बनू शकतं, असं म्हणतात. तुळशीचं रोप जमिनीवर लावू नये तुळशीचे रोप कधीही जमिनीवर लावू नये, त्याऐवजी ते कुंडीत लावावं. तुळशीची लागवड करण्यासाठी सर्वात चांगली जागा अंगणाच्या मध्यभागी असलेली कुंडी किंवा वृंदावन आहे. जर तुम्ही कुंडीत तुळशी लावू शकत नसाल तर ते रोप घरातून काढून टाका कारण जमिनीत लावलेली तुळशी अनेक आजारांचं कारण बनते, असं मानलं जातं. हे वाचा -  लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय घरात तुळशीचं रोप असेल तर हे नियम पाळाच - आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नका. असे केल्याने तुळस सुकून जाऊ शकते आणि भगवान विष्णू नाराज होऊन त्यांचा कोप होऊ शकतो. - रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी देऊ नका तसंच तुळशीला स्पर्श करू नका. - तुळशीचं रोप किचन किंवा बाथरूमजवळ ठेवू नका. - तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवू नये, झाडू मारू नये, जर तुम्हाला साफसफाई करायची असेल तर तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ कापडाने स्वच्छ करा. - तुळशीजवळ कोणतंही काटेरी रोप ठेवू नका. घरात तुळशी असणं हे हिंदू संस्कृतीचा भाग असण्यासोबत तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. त्यामुळे तुम्ही तुळस लावताना वर दिलेल्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या