JOIN US
मराठी बातम्या / रिअल इस्टेट / उंच इमारतीत कोणत्या मजल्यावर घेणे तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर, वाचा फायदे-तोटे

उंच इमारतीत कोणत्या मजल्यावर घेणे तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर, वाचा फायदे-तोटे

उंच इमारतीत घर खरेदीचा विचार करत असाल तर कोणत्या मजल्यावर घर घ्यायचं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र प्रत्येक मजल्यावर घर घेण्याचे फायदे तसेच तोटेही आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै : आता सगळीकडेच उंच-उंच इमारती बांधल्या जात आहे. कमी जागेत जास्तीत जास्त लोक राहावे, यासाठी उंच इमारतींना परवानगीही दिली जात आहे. तुम्ही देखील उंच इमारतीत घर खरेदीचा विचार करत असाल तर कोणत्या मजल्यावर घर घ्यायचं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र प्रत्येक मजल्यावर घर घेण्याचे फायदे तसेच तोटेही आहेत. चांगला व्ह्युव्ह वरच्या मजल्यावर घर घेतल्यास तिथून दिसणारा व्ह्युव्ह हा सुखद अनुभव असतो. जर तुमची बिल्डिंग निसर्गाच्या सान्निध्यात असेल तर वरच्या मजल्यावर राहण्याची मजाच वेगळी असेल. तुम्ही बाल्कनीत उभं राहून आजूबाजू्च्या व्ह्युव्हचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही खालच्या मजल्यावर घर घेतलं आणि भाड्याने देणार असाल तर तुम्हाला फायदेशीर आहे, असं एका सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे घर भाड्याने देऊन चांगला नफा मिळवू शकता, कारण भारतीय बहुतेकदा उंचीवर राहण्यापेक्षा खालच्या मजल्यावर राहणे पसंत करतात. SBI नं बंद केली अनेक बँक खाती, तुम्ही लगेच करा चेक… अन्यथा बसेल फटका प्रायव्हसी गजबजलेल्या भागात खालच्या मजल्यावर घर असेल तर तुम्हाला तितकी प्रायव्हसी मिळणार नाही. जर तुम्हाला एकटे राहायचे नसेल तर उंच मजल्यावर घर घेणे तुमच्यासाठी योग्य आहे. अनेकजण रस्त्यावर किंवा इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये कोणताही आवाज टाळण्यासाठी उंच मजल्यावर घर घेणे पसंत करतात. दुसरीकडे, जर घर तळमजल्यावर असेल आणि जिने, लिफ्ट आणि क्लब हाऊसपासून दूर असेल तर तुमच्यासाठी आवाज ही समस्या राहत नाही. तळमजल्यावर घर असल्‍याने सुरक्षेचा प्रश्न असतो. कारण चोरांना खालच्‍या मजल्यावर प्रवेश करणे सोपे जाते. मात्र हे इमारतीच्या सिक्युरिटीवरही अवलंबून आहे. तुम्ही कमी उंचीवर राहत असाल तर तुम्ही पायऱ्यांद्वारे देखील वर-खाली जाऊ शकता. पण जर तुमचे घर आठव्या किंवा नवव्या मजल्यावर असेल तर तुम्हाला लिफ्टसाठी कायमची वाट पाहावी लागेल. Aadhar Card नंबर वापरून करा पेमेंट, स्मार्ट फोनचीही आवश्यकता नाही, खूपच सोपी आहे पद्धत! जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर तुमच्यासाठी तळमजल्यावर घर असणे उत्तम. सुरक्षिततेव्यतिरिक्त, ते सोयीस्कर देखील आहे. तसेच, कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असल्यास किंवा उंचीची भीती वाटत असेल तर खालच्या मजल्यावर घर घेणे शहाणपणाचे आहे. खालच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये उंचावरील घरांच्या तुलनेत मर्यादित प्रकाश असतो. याशिवाय उंचावरील फ्लॅटमध्ये डासांची चिंताही नसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या