येरवाडा जेलमध्ये दोन गटात तुफान राडा
पुणे, 20, जून, चंद्रकांत फुंदे : पुण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. येरवाडा कारागृहात दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्व वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात येरवाडा पोलिसांनी 16 कारागृहातील कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. येरवाडा कारागृहातील सर्कल तीन जवळ असलेल्या बॅरक आठ जवळ तुफान हाणामारी झाली आहे. घटनेबाबत अधिक अशी की, येरवाडा कारागृहात वर्चस्व वादातून कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या राड्याप्रकरणात पोलिसांकडून येरवडा कारागृहातील 16 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवाडा कारागृहातील सर्कल तीन जवळ असलेल्या बॅरक आठ जवळ कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेमुळे काही काळ कारागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. Darshana Pawar : दर्शनाचा मृत्यू नेमका कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा, धक्कादायक माहिती समोर दरम्यान 2700 कैद्यांची क्षमताअसलेल्या येरवाडा कारागृहात सध्या 9 हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. कारागृहात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीनं कैद्यांचा भरणा करण्यात आल्यानं अनेक कैद्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. तसेच कारागृहात वारंवार मोबाईल फोन आणि इतर साहित्य मिळण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. मेहबूब फरीद शेख ,अनुराग परशुराम कांबळे, शुभम गणपती राठोड, रोहित चंद्रकांत जुजगर, रुपेश प्रकाश आवाडे, विशाल समाधान खरात ,आकाश उत्तम शिनगारे ,सुरज प्रकाश रणदिवे, किरण रमेश गालफाडे ,गणेश वाघमारे, मुकेश सुनील साळुंखे, सचिन शंकर दळवी, विजय चंद्रकांत विरकर, प्रणव अर्जुन रणधीर आणि प्रकाश शांताराम येवले या कारागृहातील कैद्यांनमध्ये तुफान राडा झाला आहे.