JOIN US
मराठी बातम्या / पुणे / धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळलं पिशवीत गुंडाळलेलं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये खळबळ

धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळलं पिशवीत गुंडाळलेलं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये खळबळ

पिंपरी -चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

जाहिरात

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलं दोन ते तीन दिवसांचं अर्भक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी-चिंचवड, 22 जुलै, गोविंद वाकडे : पिंपरी -चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या मरकळगावमधील सुदर्शन वस्ती येथे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं पुरुष जातीचं अर्भक आढळून आलं आहे. हे अर्भक दोन ते तीन दिवसांचं असावं असा अंदाज आहे. भर पावसात या बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रस्त्यावर सोडण्यात आलं होतं. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल   ही घटना स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सध्या या बाळावर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी मरकळ गावचे पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. भर पावसात बाळ रस्त्यावर सोडले  दरम्यान या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. भर पावसात निर्दयी मातेनं आपलं दोन ते तीन दिवसांचं बाळ रस्त्यावर सोडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरुवात केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या