JOIN US
मराठी बातम्या / पुणे / BRS : राष्ट्रवादीमध्ये फूट पडताच बीआरएस अ‍ॅक्टिव्ह; पुणे, नाशिकसाठी आखला खास प्लॅन

BRS : राष्ट्रवादीमध्ये फूट पडताच बीआरएस अ‍ॅक्टिव्ह; पुणे, नाशिकसाठी आखला खास प्लॅन

राष्ट्रवादीमध्ये फूट पडताच आता बीआरएस पक्ष अधिक अ‍ॅक्टिव्ह झाल्याचं पहायला मिळत आहे. पक्षानं आता आपला मोर्चा पुणे आणि नाशिक जिल्ह्याकडे वळवला आहे.

जाहिरात

के. चंद्रशेखर राव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 4 जुलै : राष्ट्रवादीमध्ये फूट पडताच आता बीआरएस पक्ष अधिक अ‍ॅक्टिव्ह झाल्याचं पहायला मिळत आहे. बीआरएसने आता आपला मोर्चा पुणे आणि नाशिककडे वळवला आहे. पुणे आणि नाशिकमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभा होणार आहेत. याबाबत बीआरएसचे नेते बाळासाहेब सानप आणि माणिक कदम यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हीच भाजपची बी टीम आहे, हे आता राज्यातील जनतेला समजलं आहे. मतदारांनी आपली मतदान कार्ड न जाळता बीआरएसला मतदान करावं. आम्ही तुम्हाला सक्षम पर्याय देऊ, असं आवाहन बीआरएसच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसेच राज्यात आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडत राहू असंही बीआरएसनं म्हटलं आहे.

दरम्यान बीआरएसनं  आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आपल्या विस्ताराला सुरुवात केली आहे. के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली आहे. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच पंढरपूरमध्ये देखील जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही बीआरएसनं शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर आता बीआरएसनं आपला मोर्चा पुणे आणि नाशिक जिल्ह्याकडं वळवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या