JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'मोती रंगाची साडी..' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महिला सिनेटर्सचा अजब प्रस्ताव

'मोती रंगाची साडी..' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महिला सिनेटर्सचा अजब प्रस्ताव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महिला सिनेटर्सने अजब प्रस्ताव दिल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.

जाहिरात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महिला सिनेटर्सचा अजब प्रस्ताव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 मार्च : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांनी पदवीदान समारंभ आयोजिक करण्यात येणार आहे. मात्र, हा समारंभ होण्याआधीच चर्चेत आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा अर्थात सिनेट सदस्य असलेल्या एका महिलेने केलेल्या अजब मागणीमुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी पदवीदान समारंभासाठी सिनेटर्सला विद्यापीठातर्फे गणवेश शिवून दिला जातो. मात्र, संबंधित गणवेश विद्यापीठाच्या नियमानुसार शिवला जातो. असं असताना एका महिला सिनेटने साडी कशी असावी यावर प्रस्ताव दिला आहे. काय आहे प्रकरण? सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पदवीदान समारंभासाठी एका महिला सिनेटरनं चक्क मोती रंगाच्या साडीचा प्रस्ताव दाखल केला आहे. डॉ. अपर्णा लळिंगकर या राज्यपाल नियुक्त सिनेटर आहेत. त्यांनी असा प्रस्ताव दाखल केल्याने विद्यार्थी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यापीठ अधिसभा काय साडीचे रंग ठरवण्यासाठी भरते काय? असा परखड सवाल विद्यार्थी आणि विरोधकांनी केला आहे. सिनेटमधील प्रस्तावांचा काही दर्जा उरलाय की नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पदवीदान समारंभात सिनेटर्सना विद्यापीठ शिऊन ड्रेस देतं. सधाचा ड्रेसकोड पायजमा आणि कुर्ता असा आहे. पदवीदान समारंभातील ड्रेसकोड हा विद्यापीठाच्या परिनियमानुसार निश्चित होतो. सिनेटर्सनी फक्त शैक्षणिक सुधारणांसंबंधित सुचना करणं अपेक्षित आहे. पण राज्यपाल कोट्यातून सिनेटवर वर्णी लागलेल्या मॅडमनी ड्रेसकोड सारखा गौण विषय थेट सिनेटच्या अजेंड्यावर मांडल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सिनेटर्स भाजप प्रसेनजित श्रीकृष्णा फडणवीस सागर अनिल वैद्य युवराज माधवराव नरवडे दादाभाऊ भिकाजी शिनलकर वाचा - सुनेच्या मासिक पाळीचं रक्त मांत्रिकाला विकलं अन्.., जादूटोण्याच्या प्रकारानं बीड पुन्हा हादरलं बाकेराव बस्ते ( शिवसेना ठाकरे गट) SC प्रवर्ग राहुल शिवाजी पाखरे DTNT प्रवर्ग विजय निवृती सोनवने OBC प्रवर्ग सचिन शिवाजी गोर्डे ST प्रवर्ग गणपत पोपट नांगरे महिला गट बागेश्री मिलिंद मंठाळकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या