JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवाराला शिवसेनेनं दाखवला 'हात', शिवसैनिक प्रचारातून गायब

Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवाराला शिवसेनेनं दाखवला 'हात', शिवसैनिक प्रचारातून गायब

पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

जाहिरात

पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चिंचवड, 09 फेब्रुवारी : पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. पण, मविआच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीतून शिवसेना गायब असल्याचे चित्र आहे. चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. नाना काटे आता प्रचाराला लागले आहे. (मविआ सरकार पडण्याचे शिवसेनेनं फोडले नाना पटोलेंवर खापर, केला गंभीर आरोप) शहरातील सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढत असल्याचा प्रचार महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे करत असल्याचा बघायला मिळाला आहे. मात्र त्यांच्या प्रचाराबरोबरच पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी दिसत नसल्याने महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करते का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन निवडणुकीची रणनीती ठरवणार आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक कोण असतील त्याचबरोबर कोणत्या मुद्द्यांवर चिंचवडची निवडणूक लढवली जाणार आहे. याबाबत अजित पवार आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. (राज्यात चाललं काय? काँग्रेसच्या महिला आमदाराच्या पाठीत थापड मारून तरुण पळाला, पोलिसांनी अखेर पकडले) दरम्यान, चिंचवड निवडणूक लढविण्यासाठी 40 उमेदवारांनी भरलेल्या अर्जापैकी 7 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून भाजपच्या अश्विनी जगताप या मुख्य उमेदवारांचा अर्ज वैध ठरल्याने डमी उमेदवार असलेले शंकर जगताप यांचा अर्ज नियमानुसार अवैध ठरला आहे. तर तर आपचे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांचा नामनिर्देशन पत्र अपूर्ण असल्याने त्यांचाही अर्ज ठरला बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता उरलेल्या 33 उमेदवारांपैकी आपला अर्ज माघारी कोण घेणार याची उत्सुकता लागली आहे. अर्ज माघारी घेण्यासाठीची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे. त्यामुळे अर्ज कोण मागे घेतं हे पाहण्याच ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या