JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News : तो घरोघरी जातो,शिल्लक अन्न गोळा करतो; पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही सॅल्युट कराल

Pune News : तो घरोघरी जातो,शिल्लक अन्न गोळा करतो; पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही सॅल्युट कराल

पुणेकर तरुण घरांमधील शिल्लक अन्न गोळा करून अनेकांना जगवण्याचं काम करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 31 मे : आपल्या आजूबाजूला अनेक पशु-पक्षी दिसतात असतात. यामध्ये रस्त्यावरील पशु-पक्षी अन्नाच्या शोधात असतात. याचं पशु-पक्ष्यांसाठी पुण्यातील  प्रेम लाखे या तरुणाने भूगाव या ठिकाणी अनोखा उपक्रम राबवला आहे. ज्यात तो घरोघरी शिल्लक राहिलेले अन्न गोळा करतो आणि ते भुकेल्या पशु-पक्ष्यांना खायला घालतो. त्याच्या सोबत त्याचे काही मित्र देखील या उपक्रमात सहभाग घेत असतात. कशी झाली सुरुवात? प्रेम लाखे याला नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहून, तिथं असणारे पशू-पक्षी यांच्यासोबत वेळ घालवायला आवडते. लॉकडाऊनमध्ये बसून त्याने  आणि त्याचा पक्षीमित्र प्रसाद याने पक्षांसाठी घरटे हा उपक्रम राबविला होता. यामध्ये त्याने आणि प्रसाद दोघांनी मिळून जवळपास 10 ते 12 पक्षांना घरटी बनवली आणि त्यांच्यासाठी पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली होती. प्रेम याच्या स्वतः च्या घरात 5 घरटी आहेत. ज्यात रोज सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून एक वेगळच समाधान त्याला मिळते.

एके दिवशी मला विचार आला की आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं. कधी आपल्याला मिळालेलं अन्न आपण वाया घालवतो. दिलेले अन्न टाकून देतो. पण या मुक्या प्राण्यांना कोण आहे?  भटकी कुत्री, मांजरे, पशू, पक्षी, गायी, असे अनेक पशू-पक्षी आहेत जे रोज दोन वेळच्या अन्नासाठी धडपड करत असतात. या मुक्या प्राण्यांना रोज काहीतरी खायला द्यायचे असं मी ठरवलं. म्हणून मी सुरुवातीला रोज भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, रस्त्यावर फिरणार्‍या गायींना चपात्या, पक्षांना धान्य अस देणं चालू केलं. जेवढं होईल तेवढं घरोघरी मागून आणि काही कमाईतील एक छोटासा हिस्सा प्राण्यांना द्यायला सुरुवात केली, असं प्रेम लाखे सांगतो. कामाचं समाधान हळू हळू प्रेमला या कामाचं समाधान होत गेलं. त्यानंतर त्याने काम थोडं वाढवतचं सुरू केलं. प्रेमच्या काकाची मेस आहे तर 20 ते 25 मुलांचे डबे त्यांच्याकडे असतात. तर त्या डब्यात शिल्लक असणाऱ्या शिळ्या चपात्या त्या एकत्र करण्याचे काम तो करतो आणि त्या चपात्या एकत्र करून रस्त्यावर दिसणारी भटकी कुत्री यांना वाटप करायचे काम तो करतो.

पुणेकरांचं मन मोठं, रोज घरी येतात 100 पेक्षा जास्त ‘पाहुणे’, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

पशू-पक्ष्यांना दया

संबंधित बातम्या

आधी जवळपासच्या परिसरात देत होतो पण आता गाडीवरून जवळपास मी 10 किलोमीटर अंतरावर जात असतो आणि रोज 3 तास यांच्यासाठी काढतो. माझी एक इच्छा आहे की आपण उपाशी पोटी झोपू शकत नाही मग त्यांनाही झोपू देऊ नका. कचऱ्यात अन्न टाकण्यापेक्षा आपल्या जवळपाच्याच्या पशू-पक्ष्यांना दया असे प्रेमचे मत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या