110 मुक्या जीवांचे पालक! 

शारीरिक व्यंगता आली की माणूस असहाय्य बनतो. त्याला दुसऱ्याचा मदतीची गरज भासते. 

या काळात त्याला आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते . 

मात्र प्राणी अपंग झाले तर त्यांना निवारा कोण देणार असा प्रश्न निर्माण होतो. 

माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही आधार लागतो. 

 प्राण्यांना हा आधार देण्याचं काम ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे डॉ. अर्चना जैन आणि गणराज जैन करतं आहेत.

त्यांनी या काळजीतूनच बदलापूरच्या चमतोली गावात पाणवठा हे अनाथलय सुरू केलंय. 

त्याचं हे अनाथालय या भागातील अपंग प्राण्यांचं हक्काचं घर झालंय.

गणराज आणि अर्चना यांच्या या आश्रमात 110 अपंग प्राणी आहेत.

 ते जणू त्यांचे पालकच बनले आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा समावेश आहे. 

'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास

Click Here