karve guruji
पुणे, 23 फेब्रुवारी : धार्मिक आणि ज्योतिषी तज्ज्ञ परमपुज्य श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचं मध्यरात्री दोनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तळेगाव दाभाडे इथं निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह परदेशातही भक्त आहेत. अमेरिका, हॉलंड, दुबई आणि इंग्लंडमध्ये त्यांचा भक्तपरिवार आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुणे एमआयटी इथं एका भव्य मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे. एकदाही कुंडली न पाहता आणि रुपया न घेता त्यांनी केवळ ईश्वरीय कार्य म्हणून व्रत घेतलं आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते पाळलं. हेही वाचा : सूर्य आग ओकणार, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यात पुढचे काही दिवस उन्हाचे चटके तळेगाव दाभाडे इथं निवासस्थानी श्रीकृष्ण गुरुजींचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकृष्ण गुरुजींच्या कुटुंबियांनी दिलीय.