पुणे : एप्रिल महिन्यात तापमानाने नवीन रेकॉर्ड केला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. Heat Wave चं संकट अधिक जाणवत आहे. घराबाहेर पडल्यानंतर उन्हाचे चटके इतके तीव्र आहेत की अंग भाजून निघत आहे. आता पुण्यातही 12 एप्रिल रोजी सर्वाधिक तपामानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील काही भागांमध्ये ४० अंशांहून अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क इथे तापमान 41.9 अंश होते. शिरुरमध्ये 41.7 अंश होतं. खेळ तळेगाव आणि चिंचवड इथे पारा 40 अंशाहून अधिक होता. उन्हामुळे चटके तर बसत आहेतच पण ऊन कमी झाल्यानंतरही गरम होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दुसरीकडे जळगावातही परिस्थिती भयंकर आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडा संपल्यावर देखील पारा ४० अंशापर्यंत आलेला नव्हता. मंगळवारी या हंगामात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या पुढे जावून ४१.८ अंशावर होता. बुधवारी देखील पारा ४१.६ अंशावर कायम होता.
उन्हात लेकरांची घ्या काळजी! हिंगोलीत उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यूअसं असल तरी जिल्ह्यात पुन्हा पुढचे चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सायंकाळच्या वेळेस विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Heat Wave : सूर्य आग ओकतोय! मुंबईकरांना उन्हाचा तडाखा, ठाणेकरांना चटके पारा 43 अंशांवर१३ व १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात गारपीटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने आता शेतात गहू, हरभरा नसल्याने शेतीचे फारसे नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, गारपीट झाली तर ज्वारी व केळीला फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, उनाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.