JOIN US
मराठी बातम्या / पुणे / ए आर रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी पाडला बंद; दहा वाजले तरी गाणं कसं सुरू? स्टेजवरच सुनावलं

ए आर रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी पाडला बंद; दहा वाजले तरी गाणं कसं सुरू? स्टेजवरच सुनावलं

पुणे पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी अन् कुटुंबीयसुद्धा या कार्यक्रमाला हजर होते. पण दहा वाजल्यानतंरही रात्री कार्यक्रम सुरू राहिल्याने पुणे पोलिसांनी कार्यक्रम थांबवला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, पुणे, 01 मे : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो पुणे पोलिसांनी मधेच बंद पाडला. पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी रात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडताना ए आर रहमान यांना असंही सुनावलं की, दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता? पुण्यात ए आर रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर ए आर रहमान यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली होती. पुणे पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी अन् कुटुंबीयसुद्धा या कार्यक्रमाला हजर होते. पण दहा वाजल्यानतंरही रात्री कार्यक्रम सुरू राहिल्याने पुणे पोलिसांनी कार्यक्रम  थांबवायला लावला. SS Rajamouli: पाकिस्तानने परवानगी नाकारल्याने अधुरं राहिलं एसएस राजामौलींच ‘ते’ स्वप्न; काय आहे नेमकं प्रकरण? ए आर रहमान यांचे गाणे स्टेजवर सुरू असतानाच पुणे पोलिसांनी स्टेजवर जाऊन कार्यक्रम थांबवला. पोलिसांनी यावेळी ए आर रहमान यांना १० नंतरही कसं काय गाणं सुरू ठेवलं असंही विचारलं. पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर ए आर रहमान स्टेजच्या पाठिमागे निघून गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या