JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Ajit Pawar : 'तर माझं काय चुकलं?' संघटनात्मक जबाबदारीबाबत अजितदादा पुन्हा एकदा बोलले

Ajit Pawar : 'तर माझं काय चुकलं?' संघटनात्मक जबाबदारीबाबत अजितदादा पुन्हा एकदा बोलले

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा संघटनात्मक जबाबदारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जाहिरात

अजितदादांच्या मागणीने खळबळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी बारामती, 25 जून : मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही रस नाही. मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी संघटनेतील कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. पवारांच्या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही ओबीसी प्रदेशाध्यक्ष निवडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. काय म्हणाले अजित पवार? मला आता संघटनात्मक जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केली होती. याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, मी सत्तेतली अनेक पदं सांभाळून झाली आहेत. आता मला संघटनेत काम करावसं वाटत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? मला जे वाटलं ते सांगितलं आहे. वेगवेगळ्या घटकांना संधी मिळाली पाहिजे. माझं मत मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडलं आहे. आता निर्णय पक्षाने घ्यावा. छगन भुजबळ काय चुकीचे बोलले? त्यांनीही त्यांचे मत मांडलं आहे. आता यावर पक्ष निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. वाचा - ‘…तेव्हा माझी आठवण काढ’, राष्ट्रवादी सोडणाऱ्या नेत्याला पटोलेंची भावनिक साद काही निर्णय मागेही घ्यावे लागतात पुढे अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत मी प्रवासात गप्पा मारल्या. त्यांच्या काही योजना आहेत, त्या जाणून घेतल्या. कर्नाटकात काही ओळखीचे लोक आहेत ते सांगत होते. कर्नाटकात महिलांना बसेस फ्री असल्याने पुरुषांना जागा मिळत नाही.. मुलामुलींना शाळेत जायला जागा मिळत नाही. जे तिकीट काढणार आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. काही योजना निवडणुका जिंकण्यासाठी असतात. तर काही योजना जनतेच्या भाल्याच्या असतात. काही योजना घोषित करून मागे घ्याव्या लागतात. योजना देताना राज्याची आर्थिक क्षमता असली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या