JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'अजित पवारांचा पिंड फील्ड वर..' भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी दिलं उत्तर

'अजित पवारांचा पिंड फील्ड वर..' भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी दिलं उत्तर

शरद पवार यांनी बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

जाहिरात

शरद पवारांनी दिलं उत्तर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती, 6 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (5 मे) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. शुक्रवारच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार यांनी आज बारामती येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याविषयी होणाऱ्या चर्चेवर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काय म्हणाले पवार? 56 वर्ष मी निवडून आल्यापासून संसद आणि विधानमंडळात आहे. मला काही महिन्यांपासून वाटू लागेल की अनेक वर्षे मी जबाबदारी घेत आहे. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला. पक्षातील कार्यकर्ते यांची एवढी तीव्र प्रतिक्रिया येईल, असं वाटले नाही. दोन दिवसात समजूत काढू असं वाटले होते पण तसे झाले नाही. अनेक महत्त्वाच्या लोकांच्या प्रतिक्रया येत होत्या. मी बाजूला राहणे योग्य नाही, असे लोकांनी मला कळवले. म्हणून हा निर्णय मागे घ्यावा लागला. निकाल काहीही लागला तरी विधान भवनात कोणताही बदल होणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. वाचा - अश्रूंचा बांध फुटला, जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ढसाढसा रडला, Video पुढे पवार म्हणाले, की निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तरी बहुमत त्यांच्याकडे आहे. बारसू येथील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. उद्योग मंत्री यंच्याशी चर्चा झाली. पर्यावरणात बदल न होता शेतकऱ्यांच्या हिताचे आणि रोजगार कसा निर्णय घ्यावे लागतील. पोलीस बळाचा वापर करून होणार नाही. अजित पवार भाजप सोबत जाणार अशा चर्चा होतात. परंतु, तसे काही घडले आहे का? मी कुठे ही गेलो तरी तुम्ही भेटला तर मी बोलतो. अजित पवारांचा पिंड फील्डवर काम करण्याचा आहे. काही लोक काम करणारे आहेत. अजित पवारांना मिडियात येण्याची चिंता नाही. अजित पवारांबद्दल जे बोलले जाते ते तसे नाही, असं सांगत हा विषय पवार यांनी संपवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या