पुणे, 12 ऑक्टोबर: ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्यभर पावसानं जोरदार हजेरी (heavy rainfall in maharashtra) लावल्यानंतर, आता राज्यात मान्सूच्या परतीचा प्रवास (Monsoon withdrawn in maharashtra) सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर देखील ओसरला आहे. आज जवळफास अर्ध्या महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वारे गायब झाले आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी राज्याला शेवटचा तडाखा देण्यासाठी मान्सून सज्ज झाला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तास राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेशातील उर्वरित भागातून आज मान्सून परतला आहे. तर महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यातील आणखी काही भागातून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पुढीला एक दोन दिवसात महाराष्ट्रातून पूर्णपणे मान्सून गायब होणार आहे. असं असलं तरी पुढील चोवीस तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील काही तासात कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज पुण्यासह, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हेही वाचा- BREAKING: 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता, लवकरच सुरू होणार लसीकरण उद्यापासून राज्यात मान्सूनचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान राज्यात कुठेही पावासाचा इशारा देण्यात आला नाही. या तिन्ही दिवशी राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. शनिवारी 16 ऑक्टोबर रोजी मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी हवामान खात्याने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे.