JOIN US
मराठी बातम्या / पुणे / जुन्नरमध्ये भीषण अपघातात 5 ठार, 2 चिमुकल्यांचा समावेश, 3 गंभीर जखमी

जुन्नरमध्ये भीषण अपघातात 5 ठार, 2 चिमुकल्यांचा समावेश, 3 गंभीर जखमी

तीनही वाहनांची अंधारात समोरा समोर भीषण धडक झाली. यात पिकअपने दोन दुचाकीसह आठ जणांना चिरडले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचंद शिंदे, जुन्नर, 28 मार्च : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात एका चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला. अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींना धडक दिली. यात ८ जण चिरडले गेले. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात नेण्याआधी मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत इथे पिकअपने दोन दुचाकीसह आठ जणांना चिरडले. तीनही वाहने समोरासमोर धडकली. या अपघातात एका लहान मुलाचा आणि व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सहा जणांपैकी आणखी तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. माता न तू वैरिणी! आईनेच 4 वर्षीय मुलीला चाकूनं भोसकून ठार मारलं; पुण्यातील खळबळजनक घटना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघांवर  उपचार सुरु असून पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातग्रस्तांना स्थानिकांनी मदत करत रुग्णालयात पोहोचवले. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून आळेफाटा पोलिस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या