JOIN US
मराठी बातम्या / पुणे / धक्कादायक! रात्री लाईट नव्हती म्हणून दिवा लावला अन् घात झाला; वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! रात्री लाईट नव्हती म्हणून दिवा लावला अन् घात झाला; वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

जुन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

जाहिरात

वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 16 जुलै, रायचंद शिंदे : जुन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. जुन्नरमधील साबळेवाडीत ही घटना घडली आहे. मारुती भाऊ साबळे (वय 83) व पुताबाई मारुती साबळे (वय 73) असं या पती-पत्नीचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडी येथील आदर्श पुरस्कार विजेते  माजी सरपंच मारुती साबळे व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे यांच्या घराला रात्रीच्यावेळी आग लागली. आग लागल्यानंतर वेळीच बाहेर पडता न आल्यानं त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. साबळेवाडी या छोट्या वस्तीमध्ये मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपले होते. रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला. तसेच घरात आग पसरली. आग वाढल्याने दोघांना जाग आली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडल्यानं श्वास गुदमून दोघे जागीच कोसळले, धुरामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.   त्यांच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या